फोटो सौजन्य - Social Media
भारतीय पटसन निगम लिमिटेड (The Jute Corporation of India Limited) ने भरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेसंबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये HSC उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. अर्ज प्रक्रिया सप्टेंबरच्या १० तारखेपासून सुरु झाली आहे. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : ८०० जागांपेक्षा जास्त जागांसाठी भरतीला सुरुवात; अंगणवाडी कार्यकर्ता पदी होणार निवड
भारतीय पटसन निगम लिमिटेडमधील विविध पदांतील एकूण ९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या विविध पदांमध्ये अकाउंटंट पदाचे 23 जागा, ज्युनियर असिस्टेंट पदाची २५ जागा तर कनिष्ठ इंस्पेक्टरच्या 42 जागांचा समावेश आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांना त्याचा आढावा घेता येणार आहे. या अधिसूचनेमध्ये भरती संदर्भातील सर्व सखोल माहिती पुरवण्यात आली आहे.
महत्वाची बाब म्हणजे अधिसूचनेमध्ये वयोमर्यादे तसेच शैक्षणिक अटी आणि शर्ती नमूद आहेत. या अटी तसेच शर्तीना पात्र असणाऱ्या उमेदवारांनाच या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार आहे. जर तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करू इच्छुक आहात तर सर्वप्रथम तुमचे वय जास्तीत जास्त ३० वर्षांइतके असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये काही प्रमाणात सूट मिळून जाईल. अधिसूचनेनुसार, विविध पदांसाठी विविध शैक्षिण अटी ठेवण्यात आल्या आहेत. ज्युनिअर इन्स्पेक्टरच्या पदासाठी अर्ज करू इच्छुक उमेदवाराकडे ३ वर्षांचे अनुभव तसेच १२ वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र हवे. पदवीधर तसेच टायपिंगचा नॉलेज असणाऱ्या उमेदवाराला ज्युनिअर असिस्टंट पदी काम करता येणार आहे. तर अकाउंटंटच्या पदासाठी अर्ज करण्यसाठी उमेदवाराचे एमकॉम किंवा बीकॉम उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
भारतीय पटसन निगम लिमिटेड उमेदवारांची नियुक्ती काही टप्प्यांच्या आधारे घेणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येईल. यानंतर उमेदवारांचे कामातील कौशल्य तपासण्यासाठी त्यांच्या कौशल्याची चाचणी घेण्यात येईल. शेवटी दस्तऐवजांची तपासणीसह उमेदवारांनाही वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. एकंदरीत, या ४ टप्प्यांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती केली जाईल.