फोटो सौजन्य - Social Media
सरकारी क्षेत्रामध्ये कामाची संधी तयार झाली आहे. अंगणवाडी क्षेत्रामध्ये काम करू पाहणार्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही अंगणवाडी क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा बाळगून आहात किंवा तुम्ही रोजगाराच्या शोधात आहात तर या भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही नक्कीच सहभाग घेतला पाहिजे. या संदर्भात अधिकृत अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये या भरती प्रक्रियेविषयक सखोल माहिती नमूद केली आहे. या माहितीच्या आधारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतो आणि या भरती प्रकियेमध्ये आपला सहभाग नोंदवू शकतो. जर तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याची इच्छा बाळगत आहात तर या अधिसूचनेचा आढावा नक्की घ्या.
हे देखील वाचा : ‘या’ विमानतळावर भरती प्रक्रियतेला सुरुवात; Handymanच्या पदासाठी नियुक्ती सुरु
या भरती प्रक्रियेमध्ये अंगणवाडीतील दोन मुख्य पदांचा विचार केला जाणार आहे. या रिक्त पदांमध्ये आंगनवाडी कार्यकर्ता आणि असिस्टंट पदांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये ८०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत सहभाग घेऊ पाहणाऱ्या उमेदवारांना अर्ज नोंदवावे लागणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना icdspsbdn.in या अधिकृत संकेतस्थळावर आपले अर्ज नोंदवता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०२४ आहे, असे अधिसूचनेमध्ये नमूद केले गेले आहे. म्हणून इच्छुक असलेल्या उमेदवारांना मुदती अगोदर अर्ज करण्याचे आवाहन केले गेले आहे. मुदतीनंतर केले गेलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
हे देखील वाचा : BIS मध्ये अनेक पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती; पगार ऐकाल तर थक्क व्हाल
वयोमर्यादेसंबंधित तसेच शैक्षणिक अटींना पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे इतके असले पाहिजे. तर उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे इतकी आहे. एक्नाद्रित, अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांचे वय १८ वर्षे ते ३५ वर्षांइतके असेल. तसेच अधिसूचनेमध्ये जाहीर केलेल्या अटींमध्ये नमूद आहे कि उमेदवाराचे किमान शिक्षण HSC उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर उमेदवार संबंधित पंचायत समितीचा स्थानिक निवासी असावा. निवड लिखित परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल. तसेच निवडीत उमेदवार ४,५०० रुपयांचे दरमाह मानधन दिले जाईल.