Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad Doctor Fraud Case: उंब्रज-कराडमध्ये खळबळ! बनावट सीबीआय अधिकारी बनून डॉक्टर दाम्पत्याला लुटले; गुन्हा दाखल

Karad Doctor Fraud Case: कराडमध्ये वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचे आमिष दाखवून डॉक्टर दाम्पत्याची १ कोटी १५ लाखांची फसवणूक करण्यात आली. सीबीआयच्या नावाने भीती दाखवून खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 19, 2026 | 11:33 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Karad Doctor Fraud Case: वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टर दाम्पत्याकडून लाखो रुपये घेणे, त्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासात नाव आल्याची भीती दाखवून कथितरीत्या खंडणी उकळणे आणि पुन्हा कोट्यवधी रुपयांची मागणी करणे, असा गंभीर प्रकार उंब्रजसह कराडमध्ये समोर आला आहे. या प्रकरणात डॉक्टर दाम्पत्याची एकूण १ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, आणखी १ कोटी ३५ लाख रुपये मागितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषातून होणारी फसवणूक आणि तपास यंत्रणांच्या नावाचा गैरवापर करण्याच्या कथित प्रकाराबाबत चिंता व्यक्त होत आहे.

डॉ. वैशाली अजित थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.३८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुष्कर सुभाष कुलकर्णीर.कराड, अनिकेत सदाशिव चव्हाण रा. वडगांव(उंब्रज) आणि दोन अनोळखी व्यक्तींचा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मेडिकल प्रवेशाचे आश्वासन देत विश्वास संपादन

फिर्यादीतील माहितीनुसार, कराडमधील खासगी शिकवणी घेणारा पुष्कर कुलकर्णी हा डॉक्टर दाम्पत्याच्या संपर्कात आला. त्यांच्या मुलाने एमबीबीएस पूर्ण केले असून तो पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत असल्याची माहिती त्याला होती. मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याची व्यवस्था करता येईल, असे सांगून त्याने दाम्पत्याचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे.

१३ एप्रिल २०२६ रोजी कराड तहसील कार्यालय ते कावनाका रस्त्यावर भेटीदरम्यान ३५ लाख रुपये रोख देण्यात आले. या व्यवहाराची नोटरी पावती करून देण्यात आली आणि परतफेडीसाठी २५ सप्टेंबर २०२६ ही तारीख नमूद केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर जुलै महिन्यात आणखी १५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. या रकमेबाबतही धनादेश देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. अशा प्रकारे प्रवेशाच्या आमिषाने एकूण ५० लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सीबीआय तपासाचे नाव सांगून भीती दाखवल्याचा आरोप

यानंतर कथित प्रकाराला वेगळे वळण मिळाले. नीट-पीजी परीक्षेतील पेपर घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याचे सांगून डॉक्टर दाम्पत्याचे नाव तपासात आले आहे, त्यांचे फोनवरील संभाषण नोंदवले गेले आहे आणि अटक होऊ शकते, अशी भीती दाखवण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
१९ ऑगस्ट रोजी तासवडे टोलनाका परिसरात बोलावून नंतर वहागावजवळ भेटल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. तेथे कथित आरोपीने प्रकरण मिटवण्यासाठी सीबीआयकडून दहा कोटी रुपयांची मागणी होत असल्याचे सांगितले. दाम्पत्याने एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर दोन कोटी रुपये देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रस्ताव मांडल्याचा आरोप आहे.

पुण्यात ६५ लाख रुपये घेतल्याचा दावा

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, भीतीपोटी दाम्पत्याने पतसंस्थेतील ठेवी मोडून आणि सोन्याचे दागिने विकून सुमारे ६५ लाख रुपये जमा केले. २० ऑगस्ट रोजी रात्री पुण्यातील आंबेगाव परिसरात भेट झाली. काही वेळानंतर पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी तेथे आली. त्यातील व्यक्तींनी सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून दमदाटी केली आणि पैशांची बॅग वाहनात ठेवण्यास सांगितले, असा आरोप आहे.

या घटनेनंतर दाम्पत्य घाबरले आणि तातडीने पोलिसांकडे जाण्याऐवजी पुण्यातील नातेवाइकाकडे राहिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अशा प्रकारे प्रवेशाच्या आमिषाने घेतलेल्या ५० लाखांसह आणखी ६५ लाख रुपये गेल्याचा दावा करण्यात आला आहे. एकूण रक्कम १ कोटी १५ लाख रुपये होते.

घरापर्यंत पोहोचली कथित खंडणीची मागणी

३ ऑक्टोबर रोजी सकाळी एक अनोळखी व्यक्ती डॉक्टरांच्या घराच्या प्रवेशद्वारावर आली. तिने राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण मंडळाशी संबंधित अधिकारी असल्याचे सांगितले आणि साताऱ्यात आणखी रक्कम घेऊन येण्यास सांगितल्याचा आरोप आहे. यानंतर कथित आरोपींकडून १ कोटी ३५ लाख रुपयांची मागणी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पैसे न दिल्यास नुकसान करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तक्रार दाखल करण्यापूर्वीही धमकावल्याचा आरोप

डॉक्टर दाम्पत्याने नातेवाइकाच्या मदतीने संपूर्ण प्रकाराची माहिती घेतल्यानंतर पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. फिर्यादीत ९ ऑक्टोबर रोजी तक्रार अर्ज दिल्याचा उल्लेख आहे. ११ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी संबंधितांना बोलावून चौकशी केली. त्या वेळी पुष्कर कुलकर्णी याने ५० लाख रुपये घेतल्याचे मान्य करून मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देता येणार नसल्याचे सांगितल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. पुण्यात सीबीआय अधिकारी म्हणून आलेल्या व्यक्तीने घेतलेले ६५ लाख रुपये अनिकेत चव्हाण याच्या मदतीने स्वीकारल्याचेही त्याने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

NIFT Entrance Exam 2027: फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! NIFT प्रवेश परीक्षेचे ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सुरू

१४ ऑक्टोबरपर्यंत पैसे परत करण्याचे आश्वासन मिळाल्याने दाम्पत्याने तातडीने गुन्हा दाखल केला नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, १५ ऑक्टोबर रोजी कराडमधील हॉटेल अलंकार येथे झालेल्या भेटीदरम्यान तक्रार केल्यास तुरुंगात पाठवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर दाम्पत्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

विविध कलमांनुसार गुन्हा; तपास सुरू

कराड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५), ३०८(२), ३०८(३), ३०८(६), ३०८(७), ३१८(२), ३१८(४), ३१९(२), ३३६(३) आणि ३३८ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक निखिल श्रीपती मगदूम यांच्याकडे देण्यात आल्याची नोंद एफआयआरमध्ये आहे.

Income Tax Bharti 2026: दिल्लीच्या आयकर विभागात बंपर भरती; परीक्षा न देता मिळावा सरकारी नोकरी

या प्रकरणात कथितरीत्या वापरलेली वाहने, पैशांचे व्यवहार, धनादेश, नोटरी कागदपत्रे, मोबाइल संभाषणांच्या नोंदी आणि घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात.सुशिक्षित डॉक्टर कुटुंब अशा अनधिकृत बाबीमध्ये फसत असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था होणार, अशीच चर्चा सुरू असून याप्रसंगी पोलिसांनी काटेकोरपणे तपास यंत्रणा राबवून योग्य ती शिक्षा संशयित आरोपींना होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अनिकेत चव्हाण याचा पूर्व इतिहास उंब्रज पोलीस ठाण्यात नोंद असून अगदी तडीपारीच्या तोंडातून कोणत्या राजकीय नेत्याने त्याला वाचविले याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कराडमधील या फसवणूक प्रकरणात डॉक्टर दाम्पत्याची किती रुपयांची फसवणूक झाली आहे?

    Ans: फिर्यादीनुसार, मेडिकल प्रवेशाचे आमिष दाखवून आणि सीबीआयची भीती घालून डॉक्टर दाम्पत्याची एकूण १ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असून, आणखी १ कोटी ३५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

  • Que: आरोपींनी फसवणूक करण्यासाठी कोणती युक्ती वापरली होती?

    Ans: आरोपींनी सुरुवातीला मॅनेजमेंट कोट्यातून वैद्यकीय पदव्युत्तर (MD/MS) प्रवेश मिळवून देण्याचे सांगितले. त्यानंतर नीट-पीजी पेपर घोटाळ्यात नाव आल्याची व सीबीआय चौकशीची भीती दाखवून पुण्यामध्ये पैसे उकळले.

Web Title: Karad doctor fraud cbi extortion medical admission scam satara news marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Froud News
  • NEET Exam
  • NEET exam scam

संबंधित बातम्या

Admission Scam: डोळे निरोगी, पाय धडधाकट; तरीही बनवले ‘दिव्यांग’ प्रमाणपत्र! दून मेडिकल कॉलेजमध्ये MBBS प्रवेशाचा मोठा बनाव उघड
1

Admission Scam: डोळे निरोगी, पाय धडधाकट; तरीही बनवले ‘दिव्यांग’ प्रमाणपत्र! दून मेडिकल कॉलेजमध्ये MBBS प्रवेशाचा मोठा बनाव उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.