Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांना आता नो टेंशन…! शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे होणार सोपे, 10 वी, 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच कागदावर

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे सुलभ करण्यासाठी 10वी-12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच कागदावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र्य दिले जाते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 30, 2026 | 12:54 PM
शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे होणार सोपे, 10 वी, 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच कागदावर

शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे होणार सोपे, 10 वी, 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच कागदावर

Follow Us
Follow Us:
  • शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे होणार सोपे
  • 10 वी, 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच कागदावर
  • गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र्य दिले जात
प्रशांत काळे, नाशिक: दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र न देता ते एकत्रित देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. यापूर्वी गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र्य दिले जात होते.

यापुढे मात्र ते एकत्रित म्हणजेच एकाच कागदावर दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या फाईलमधील बोझा कमी होणार असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे अधिक सुलभ आणि सोपे होणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दस्ताऐवज सांभाळणे सोपे व्हावे, यासाठी शिक्षण मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थी ज्या काही पदवी व पदविका प्राप्त करता, त्यासाठी बोर्ड व विद्यापीठाकडून गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्ररित्या दिले जाते.

Nashik School : मनपा शाळेत ‘वॉटर बेल’, उन्हाच्या तडाख्यापासून विद्यार्थ्यांचे होणार संरक्षण

यामुळे विद्यार्थ्यांच्या फाईल वरील बोजा वाढतो. तसेच हे गुणपत्रक व प्रमाणपत्र सांभाळणे देखील कठीण जाते. याशिवाय प्रवेश प्रक्रिया व अन्य कामांसाठी गुणपत्रक व प्रमाणपत्राच्या खूप साऱ्या झेरॉक्स प्रति देखील काढाव्या लागत असल्याने अधिकचे पैसे देखील खर्च होतात. मात्र दहावी बारावी बोर्डाकडून आता गुणपत्रक व प्रमाणपत्र एकाच कागदावर मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नावाच्या क्रमातही होणार बदल

फेब्रुवारी मार्च २०२६ च्या दहावी व बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा नवीन बदल लागू राहणार असल्याचे मंडळाने रूष्ट केले आहे. मंडळाने सर्व विभागीय मंडळांना या नवीन प्रक्रियेची अंमलबाजवणी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच नावाच्या क्रमातही बदल केला जाणार आहे. यापुढे गुणपत्रकावर विद्याथ्यांचे नाव प्रथम्, त्यानंतर वडिलांचे नाव आणि सर्वात शेवटी आडनाव छापले जाणार आहे. यामुळे नावाच्या सुसूत्रतेमुळे पुढील प्रवेश प्रक्रिया देखील सुलभ होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

फोटो दुरुस्तीसाठी शेवटची संधी

ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील (हॉल तिकीट) वरील फोटो अस्पष्ट होते आणि ज्यांचे फोटो मुख्याध्यापकांनी दुरुस्त केले आहेत, अशा विद्यार्थ्यांची माहिती पुन्हा अपलोड करणे अनिवार्य राहणार आहे. यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर ‘फोटो करेक्शन’ हि लिंक सक्रिय करण्यात आली आहे.

राज्यातील शाळांसाठी ‘या’ तारखेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर; 15 जूनला पुन्हा शाळा सुरू होणार

Web Title: Keeping academic documents will become easy 10th and 12th mark sheets and certificates on a single paper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • HSC
  • Nashik
  • SSC

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांना ट्रम्प जबाबदार? ‘महासभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात ठराव करा’
1

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांना ट्रम्प जबाबदार? ‘महासभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात ठराव करा’

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
2

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Nashik Kumbh Mela Tender Scam:नाशिक कुंभमेळ्याच्या नावे ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
3

Nashik Kumbh Mela Tender Scam:नाशिक कुंभमेळ्याच्या नावे ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

Fasting Food Prices: यंदा श्रावणातील उपवासही महागणार!फळांसह किराणा मालाच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर
4

Fasting Food Prices: यंदा श्रावणातील उपवासही महागणार!फळांसह किराणा मालाच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.