फोटो सौजन्य - Social Media
युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)ने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेच्या माध्यमातून कंबाइंड मेडिकल सर्विसेस एक्जामिनेशन (CMS) २०२५ संबंधित माहिती पुरवण्यात आली आहे. विविध सरकारी विभागांमध्ये मेडिकल ऑफिसरच्या पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. तर उमेदवारांना ११ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. ऍडमिट कार्ड परीक्षेच्या आधी जाहीर करण्यात येतील. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क करायचे आहे. तर OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २०० रुपये रक्कम भरायची आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, PwBD तसेच महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणतीही रक्कम भरण्याची गरज भासणार नाही आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यास काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहेत. हे पात्रता निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत.
अधिसूचनेमध्ये नमूद शैक्षणिक अटींनुसार, मेडिकल ऑफिसरच्या या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवार MBBS असणे आवश्यक आहे. मेडिकल ऑफिसरच्या पदासाठी २२६ पदे रिक्त आहेत. असिस्टंट डिव्हिजनल मेडिकल ऑफिसरच्या पदासाठी एकूण ४५० जागा रिक्त आहेत. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरच्या पदासाठी एकूण ०९ जागा रिक्त आहेत तर GDMO ग्रेड २च्या पदासाठी एकूण २० जागा रिक्त आहेत. वयोमर्यादे संदर्भात असलेल्या अटीनुसार, या भरतीत अर्ज करण्यासाठी उमेदवारांची आयु ३२ वर्षे असली पाहिजे. तर Medical Officers Grade in CHS पदासाठी जास्तीत जास्त वय ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत अधिक ५ वर्षांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. OBC साठी अधिक ३ वर्षे सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
नियुक्तीच्या टप्प्यात खालील टप्प्यांचा समावेश आहे:
अशा प्रकारे करता येईल अर्ज: