फोटो सौजन्य - Social Media
इंग्रजी भाषा कौशल्य चाचणीतील संभाव्य पूर्वग्रहांबाबत पीअरसनने (FTSE: PSON.L) एक सर्वेक्षण केले आहे. शिक्षण, नोकरी आणि स्थलांतराच्या संधींसाठी इंग्रजी परीक्षा देणाऱ्या भारतीय परीक्षार्थींना त्यांच्या उच्चारांच्या लहेजा, पोशाख आणि दर्शनी रूपामुळे अन्यायकारक फटका बसतो, असे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. सर्वेक्षणानुसार, ६२% परीक्षार्थींना वाटते की भारतीय लहेजातील उच्चारांमुळे त्यांचे गुण कमी होतात. त्याच वेळी, ७४% लोकांच्या मते परीक्षेवेळी पोशाखाचा परिणाम गुणांवर होतो.
६४% जणांना असे वाटते की परदेशी उच्चार केल्यास चांगले गुण मिळतात, तर ७६% जण औपचारिक पोशाख परिधान करणे गरजेचे असल्याचे मानतात. या पूर्वग्रहांबाबत महाराष्ट्रातील परीक्षार्थी विशेषतः ठाम आहेत. येथे ६७% लोकांनी उच्चार आणि पोशाखामुळे होणाऱ्या संभाव्य भेदभावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ५९% प्रतिसाददात्यांना असे वाटते की त्यांच्या वर्णामुळे त्यांना वेगळी वर्तणूक मिळू शकते, तर ६४% जण पोशाखामुळे चुकीची छाप पडण्याची भीती व्यक्त करतात. पंजाबमधील ७७% लोकांनी सांगितले की त्यांच्या बाह्य रूपाचा परीक्षेतील निकालावर प्रभाव पडतो.
पीअरसनच्या इंग्रजी भाषा विभागाचे संचालक प्रभुल रवींद्रन यांनी स्पष्ट केले की, “भारतात अनेक वर्षांपासून लोकांना त्यांचे उच्चार आणि दिसणे याबद्दल वाटणाऱ्या असुरक्षितता त्यांना उपलब्ध असलेल्या संधी निर्धारित करत आहेत, आणि अखेरीस त्यांच्या उत्पन्नाच्या संभाव्यतांवर याचा परिणाम होत आहे. लोकांचे भवितव्य पणाला लागलेले असण्याच्या महत्त्वपूर्ण परिस्थितींमध्येही याचा परिणाम होताना आम्ही बघितले आहे. इंग्रजी भाषेची परीक्षा आणि व्यापक जागतिक गमनशीलतेच्या क्षेत्रातही ही आव्हाने आहेतच. मात्र, पीअरसनमध्ये आम्ही हे चित्र पालटून टाकण्यासाठी काम करत आहोत. आमची मूल्यमापन प्रणाली जबाबदार एआय व भाषा तज्ज्ञांचा उपयोग करून घेते आणि केवळ भाषेतील प्रावीण्यावर लक्ष केंद्रित करते. शब्दोच्चारांच्या १२५ हून अधिक पद्धती ओळखणाऱ्या तंत्रज्ञानाद्वारे समोरासमोर मुलाखतींपासून ही प्रणाली मुक्त आहे. पूर्वग्रह नाहीसे करणारी आणि इंग्रजी भाषेच्या कौशल्यांवर भर देणारी चाचणी तयार करून एक सकारात्मक व समावेशक वातावरण निर्माण करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवतो. या वातावरणात प्रत्येकाला आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची योग्य संधी मिळते.”
पीअरसनने १२५ हून अधिक शब्दोच्चार प्रकार ओळखणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे मानवी परीक्षकांच्या पूर्वग्रहांपासून मुक्त आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिक न्याय्य मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्वेक्षण इंग्रजी चाचण्यांमध्ये समावेशक आणि पूर्वग्रहमुक्त प्रणालीची आवश्यकता दर्शवते. परीक्षार्थींचे मूल्यमापन त्यांच्या ज्ञानावर व्हावे, उच्चारांच्या लहेजा किंवा पेहरावावर नव्हे, ही या चळवळीची प्रमुख मागणी आहे. #PTEForFairness या मोहिमेच्या माध्यमातून पीअरसन हा बदल घडवून आणण्याच्या दिशेने कार्यरत आहे.