फोटो सौजन्य - Social Media
बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या करिअरची ज्योत पेटवण्यासाठी उत्सुक आहात. तर त्या वेळेची आणखीन प्रतीक्षा करावी लागणार नाही आहे. बँक ऑफ बडोदाने एक आनंदाची बातमी दिली आहे. मुळात, ४००० रिक्त जागांना या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. उमेदवारांनो जर तुम्ही इच्छुक आहात तर नक्कीच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. चला तर मग या भरती प्रक्रियेविषयी जाणून घेऊयात.
बँक ऑफ बडोदाने या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. उमेदवारांना या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र असणे अनिवार्य आहे. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. अधिसूचनेत नमूद या पात्रता निकषांनुसार, उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पदवीधर असणे अनिवार्य आहे. तसेच कमीत कमी २० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर नियमांनुसार,आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीत वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक ५ वर्षांसाठी सूट देण्यात येईल. तर OBC प्रवर्गासाठी अधिक ३ वर्षे सूट देण्यात येईल. या संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
१९ फेब्रुवारी २०२५ पासून भरतीचे अर्ज स्वीकारण्यास सुरु करण्यात आले आहे. उमेदवारांना ११ मार्च २०२५ या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. परीक्षेसंबंधित तारखा अद्याप जाहीर नाही आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क भरायचे आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ८०० रुपये भरायचे आहे. तसेच OBC आणि EWS प्रवर्गांकडून सारखीच रक्कम आकारण्यात येणार आहे. SC तसेच ST आणि महिला उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर PWBD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्ह्णून ४०० रुपये भरायचे आहे.
एकूण चार टप्प्यांमध्ये उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा, दस्तऐवजांची पडताळणी, लँग्वेज प्रोफेशिअन्सी टेस्ट आणि मेडिकल परीक्षेला हजेरी लावून त्यांना पास करावे लागणार आहे. तरच उमेदवारांना नियुक्तीस पात्र होता येणार आहे.