फोटो सौजन्य - Social Media
भारतामध्ये विदेशी शिक्षण प्रणालीने पहिले पाऊल ठेवले आहे. भरटीओचे विद्यार्थ्यांना आता विदेशी शिक्षण प्रणाली अनुभवता येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकता येणार आहे. अनेक नव्या उपक्रमांबद्दल माहिती मिळणार आहे. तसेच भारतीय शिक्षण आणि विदेशी शिक्षणाचे नवे संगम पाह्यला मिळणार आहे. साऊथेमप्टंन युनिव्हर्सिटीने भारतामध्ये कॅम्पस उघडण्याचा निर्णय घेतला आहे. तससह भारतीय प्रशासनानेही या निर्णयाला संमती दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच भारतीय विद्यार्थ्यांना साऊथेमप्टंन युनिव्हर्सिटीची शिक्षण प्रणाली अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी विद्यार्थ्यांना इंग्लंडला जाण्याची मुळीच गरज नाही, अगदी भारतामध्ये या अंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठात शिक्षण घेता येणार आहे.
विशेष गोष्ट म्हणजे साऊथेमप्टंन युनिव्हर्सिटी पहिली विदेशी विद्यापीठ आहे जो भारतात आपले कॅम्पस तयार करत आहे. राष्ट्रीय शिक्षण नीती २०२० च्या अंतर्गत साऊथेमप्टंन युनिव्हर्सिटीला कॅम्पस खोलण्याची परवानगी देण्यात आली आहे. साऊथेमप्टंन युनिव्हर्सिटीने आंतरराष्ट्रीय दर्जावर एक अनोखी प्रतिमा तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या युनिव्हर्सिटीने QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये ८१वे पॅड पटकावले आहे. तर टाइम हायर एजुकेशन वर्ल्ड युनिव्हरडिटी रँकिंगमध्ये ९७ वे स्थान मिळवले आहे.
हे देखील वाचा : RRB अर्ज प्रक्रियेमध्ये करण्यात आले बदल; आधार कार्ड वेरिफिकेशन अनिवार्य
युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन (UGC) ने २०२३ मध्ये याविषयी घोषणा केली होती कि देशामध्ये विदेशी विद्यापीठांच्या परिसराला चालना दिली जाईल. नुकतेच साऊथेमप्टंन युनिव्हर्सिटीने देशाची राजधानी दिल्लीमध्ये म्हणजेच NCR परिसरात कॅम्पस खळे करण्याचा निर्णय दिला होता. तसेच त्यासंदर्भात देशातील शिक्षण प्रशासनाशी चारच करण्यात आली होती. दरम्यान UGC ने याला मान्यता दिली आहे. लवकरच NCR परिसरात साऊथेमप्टंन युनिव्हर्सिटी आपल्या परिसराची निर्मिती करणार आहे.
साऊथेमप्टंन युनिव्हर्सिटीने भारतात बनत असलेल्या कॅम्पससाठी १० वर्षांच्या कोर्स प्लॅन दिला आहे. यामध्ये बिजनेस अँड मॅनेजमेंट, कम्प्युटिंग, कायदा, अभियांत्रिकी, कला, विज्ञान सारख्या विषयांच्या पाठयक्रमावर लक्ष दिले जाणार आहे. मुळात पहिल्या वर्षी बीएससी कॉम्प्युटर सायन्स, बीएससी बिजनेस मॅनेजमेंट, बीएससी अकाउंटिंग अँड फायनान्स, बीएससी इकॉनॉमिक्स, बीएससी इंटरनेशनल मॅनेजमेंट तसेच एमएससी फायनान्स सारखे कोर्स जोडले जातील. दुसऱ्या वर्षी बीएससी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, बीएससी क्रिएटिव्ह कॉम्प्युटयिंग तसेच एमएससी इकॉनॉमिक्स कोर्स जोडले जातील. तर तिसऱ्या वर्षी एलएलबी लॉ अँड बी. इंजिनिअरिंग हा कोर्स जोडला जाईल. अशा प्रकारे दरवर्षी नवनवीन कोर्स जोडले जातील.