Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education News : RTE प्रवेशासाठी 2.89 लाख अर्ज दाखल; शाळा अन् जागा वाढल्या मात्र अर्जांत घट

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवण्यात येतात. यामध्ये प्रवेशासाठी राज्यभरातून यंदा २ लाख ८९ हजार ६०९ बालकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 01, 2026 | 04:47 PM
Lakhs of Student Applications Filed for 25% Reserved Seats Under RTE in Private Schools

Lakhs of Student Applications Filed for 25% Reserved Seats Under RTE in Private Schools

Follow Us
Follow Us:

RTE Admissions News : सोनाजी गाढवे : पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यभरातून यंदा २ लाख ८९ हजार ६०९ बालकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज करण्यासाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्टपणे सांगीतले.

आरटीई प्रवेशासाठी राज्य शासनाच्या वतीने केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाते. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ८ हजार ७०१ शाळांमध्ये १ लाख १४ हजार ८२६ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून एकूण २ लाख ८९ हजार ६०९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

हे देखील वाचा : भामा-आसखेडचा पुणे, पिंपरी-चिंचवडसह ४ तालुक्यांना आधार; ५.३२ टीएमसी पाणी शिल्लक

मागील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये १ लाख ९ हजार १०२ जागा उपलब्ध होत्या. त्या वेळी आरटीई प्रवेशासाठी ३ लाख ५ हजार १५१ अर्ज प्राप्त झाले होते. यंदा उपलब्ध जागांची संख्या वाढली असली तरी अर्जांची संख्या तुलनेने कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या प्रक्रियेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारे ऑनलाइन सोडत काढण्यात येणार असून प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातील शाळा निवडण्याची अट उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर शिक्षण विभागाने ती मर्यादा हटवून पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी दिली होती. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पालकांच्या मागणीचा विचार करून मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्यामुळे अर्जाची संख्या वाढलेली पहायला मिळाली.

मागील वर्षी आकडेवारी

वर्ष शाळा जागा अर्ज
2024-25 9,217 1,05,278 2,42,516
2025-26 8,863 1,09,102 3,05,151
2026-27 8701 1,14,826 2,89,609

पाच वर्षाची आरटीई प्रवेश आकडेवारी

वर्ष – विद्यार्थी नोंदणी

  • २०२३-२४ –– २,९५,०००
  • २०२४-२५ –– ३,०५,०००
  • २०२५-२६ –– ३,०५,०००
  • २०२६-२७ –– २,८९,६०९
हे देखील वाचा :  वैद्यकीय शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव? अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अजूनही अपुरा

राखवी जागांसाठी आलेले अर्ज

सर्वाधिक अर्ज पुण्यातून

 

जिल्हा शाळा प्रवेशासाठी उपलब्ध जागा आलेले अर्ज
पुणे 916 18,060 54,483
नागपूर 642 7,081 25,331
ठाणे 615 11,754 24,846
नाशिक 394 5,673 17,077
छ.संभाजीनगर 541 4,911 17,077
मुंबई 252 4,558 10,312
अहिल्यानगर 348 3765 9,200

 

Web Title: Lakhs of student applications filed for 25 reserved seats under rte in private schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • Admission News
  • education
  • Private School

संबंधित बातम्या

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..
1

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?
2

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल
3

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह
4

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.