Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांना जर्मनी, जपान, रशिया भाषेचे धडे! परदेशातील रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होणार

विद्यार्थ्यांना परदेशात रोजगारासाठी जर्मनी, जपान व रशिया भाषांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भाषा व संस्कृतीच्या ज्ञानामुळे विद्यार्थ्यांची संवाद कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 23, 2026 | 02:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

विद्यार्थ्यांना परदेशात अधिक चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संबंधित देशांची भाषा आणि संस्कृतीचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात जर्मनी, जपान आणि रशिया या देशांच्या भाषांचे प्रशिक्षण देण्यावर विशेष भर दिला जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कामकाज पद्धतीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढणार असून, त्यांचे संवाद कौशल्य, व्यावसायिक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासही अधिक मजबूत होणार आहे. परिणामी, परदेशातील रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

MHT-CET 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! PCM आणि PCB दुसऱ्या संधीसाठी मुदतवाढ; ‘ही’ आहे नोंदणीसाठी शेवटची तारीख

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील रोजगारासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांची उपस्थितीही उल्लेखनीय होती.

जर्मनीसारख्या प्रगत देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. राज्यातील पदविका विद्यार्थ्यांना या संधींचा लाभ मिळावा, तसेच त्यांना परदेशात रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि भाषा प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ नोकरीच्या संधीच नव्हे, तर जागतिक स्तरावर काम करण्याचा अनुभवही मिळणार आहे.

‘महाराष्ट्र-जर्मनी जपान कुशल कामगार गतिशीलता’ या उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उद्योगांशी समन्वय साधण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून आवश्यक पायाभूत सुविधा, जसे की वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि नेटवर्किंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय, प्रशिक्षण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण देखरेख यासाठीही योग्य समन्वय साधला जाणार आहे.

सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून एनडीएसाठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड!

या उपक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधींचे नवे दालन खुले होणार असून, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

Web Title: Language lessons in german japanese and russian for students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Career
  • Germany
  • Japan

संबंधित बातम्या

French Open 2026 मध्ये अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ऐतिहासिक विजय; पहिल्या ग्रँडस्लॅम किताबावर कोरलं नाव! थरारक सामन्यात कोबोलीचा पराभव
1

French Open 2026 मध्ये अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ऐतिहासिक विजय; पहिल्या ग्रँडस्लॅम किताबावर कोरलं नाव! थरारक सामन्यात कोबोलीचा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.