Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा; विधी प्रवेशातील मान्यतेच्या प्रश्नावर अभाविपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Maharashtra Law Admission: विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मान्यता विषयक अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 08, 2026 | 05:21 PM
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा; विधी प्रवेशातील मान्यतेच्या प्रश्नावर अभाविपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा; विधी प्रवेशातील मान्यतेच्या प्रश्नावर अभाविपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Follow Us
Follow Us:
  • विधी प्रवेश प्रक्रियेतील मान्यता विषयक अडचणी तातडीने सोडवा
  • महाविद्यालये, बीसीआय, विद्यापीठे आणि सरकारने समन्वय साधून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा
  • अभाविपचे मुख्यमंत्री व उच्च शिक्षणमंत्री यांना निवेदन
नीता परब, मुंबई : महाराष्ट्रातील तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे हजारो विधी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा देऊन कॅप प्रक्रियेत सहभाग घेतला असताना काही विधी महाविद्यालयांच्या मान्यता प्रक्रियेसंदर्भात महाविद्यालये आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यामधील अडचणींचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होत असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने म्हटले आहे.

महाविद्यालयांची मान्यता, नूतनीकरण व आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया ही संबंधित संस्था आणि सक्षम प्राधिकरणांमधील बाब असली, तरी या प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष, वेळ आणि भविष्यातील संधी धोक्यात येणे योग्य नाही. कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेणे सुरक्षित आहे, कोणती महाविद्यालये कॅप प्रक्रियेत उपलब्ध आहेत आणि पुढील फेरीत कोणती महाविद्यालये समाविष्ट होणार आहेत, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

NEET UG Counselling: नीटच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! अर्जातील चुका सुधारण्यासाठी ‘रजिस्ट्रेशन रिसेट’चा पर्याय सुरू..

सीईटी सेलच्या प्रवेश प्रक्रियेत आवश्यक मंजुऱ्या प्राप्त झालेल्या महाविद्यालयांचाच समावेश करण्यात येत असून, काही महाविद्यालये पुढील कॅप फेऱ्यांमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी उपलब्ध महाविद्यालयांच्या आधारे पसंतीक्रम भरल्यानंतर नवीन महाविद्यालयांचा समावेश झाल्यास त्यांना समान संधी कशी मिळणार, असा प्रश्न अभाविपने उपस्थित केला आहे.

तसेच, बार कौन्सिल ऑफ इंडिया कडून विधी महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या मान्यतेच्या कालावधीबाबतही पुनर्विचाराची आवश्यकता आहे. आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांना दीर्घकालीन मान्यता देण्याची शक्यता असतानाही वारंवार अल्प कालावधीची मान्यता दिल्यामुळे नूतनीकरणाची प्रक्रिया, प्रशासकीय विलंब आणि प्रवेश प्रक्रियेतील अडचणी निर्माण होतात. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचा आरोप अभाविपने केला आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या

● एलएलबी कॅप प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीचा कालावधी वाढवण्यात यावा, जेणेकरून मान्यता विषयक प्रश्न मार्गी लागेपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.
● महाराष्ट्र सरकारने तातडीने मध्यस्थी करून विधी महाविद्यालये आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यातील मान्यता विषयक अडचणी दूर कराव्यात.
● सीईटी सेल, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, बार कौन्सिल ऑफ इंडिया संबंधित विद्यापीठे व विधी महाविद्यालयांनी संयुक्तपणे विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा.
● कोणती महाविद्यालये प्रवेशासाठी पात्र आहेत व कोणत्या महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया प्रलंबित आहे, याबाबत विद्यार्थ्यांना स्पष्ट व पारदर्शक माहिती उपलब्ध करून द्यावी.
● मान्यता प्रक्रियेनंतर नवीन महाविद्यालये कॅपमध्ये समाविष्ट झाल्यास विद्यार्थ्यांना पसंतीक्रमात आवश्यक बदल करण्याची संधी द्यावी.

अभाविप मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले की, “विधी शिक्षण घेणारे विद्यार्थी हे देशाच्या न्यायव्यवस्थेचे भविष्यातील आधारस्तंभ आहेत. महाविद्यालये आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यातील मान्यता विषयक प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबाचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा देऊन प्रवेशासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे; त्यामुळे आता मान्यतेच्या प्रश्नामुळे त्यांना आपल्या भवितव्याबाबत अनिश्चिततेत ठेवणे अन्यायकारक आहे. राज्य सरकारने या विषयात तातडीने मध्यस्थी करून संबंधित महाविद्यालये, बीसीआय, सीईटी सेल आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात समन्वय साधावा.

संशोधकांसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या दरमहा ७०,००० रुपयांपर्यंतची फेलोशिप देणारी ‘PMRF योजना’ नेमकी काय आहे?

Web Title: Law admission approval issues abhavip demand maharashtra students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • education news
  • law

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.