फोटो सौजन्य - एआय
या परिपत्रकानुसार, आगामी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) आणि बारावीच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षांसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही परीक्षाशुल्क घेतले जाणार नाही. दुष्काळग्रस्त भागातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (Examination Forms) विनाशुल्क भरून घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिले आहेत.
तसेच, राज्यातील सर्व विभागीय मंडळांनी आपापल्या भागातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत या सूचना तात्काळ पोहोचवाव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने राज्य मंडळाकडे सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे.
NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..
राज्यात सर्वत्र दुष्काळ असतानाही काही महाविद्यालयांकडून परीक्षा शुल्कासाठी विद्यार्थ्यांवर तगादा लावला जात असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून राज्य मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील हजारो विद्यार्थी आणि पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. यासंदर्भातील सविस्तर व अधिकृत सूचना लवकरच संबंधित शाळा व महाविद्यालयांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहेत.






