Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CET Exam 2026: व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी उद्यापासून ‘CET’चा रणसंग्राम; ७१ हजार विद्यार्थी नशीब आजमावणार

महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षातर्फे २८ एप्रिलपासून बीसीए, बीबीए आणि बीएमएससह ७ व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सुरू होत आहे. ७१ हजार विद्यार्थी ही ऑनलाईन परीक्षा देणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 27, 2026 | 08:40 PM
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी उद्यापासून 'CET'चा रणसंग्राम (Photo Credit- X)

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी उद्यापासून 'CET'चा रणसंग्राम (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी उद्यापासून ‘CET’चा रणसंग्राम
  • ७१ हजार विद्यार्थी नशीब आजमावणार
नीती परब/मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी.एचएमसीटी), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम ), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए (इंटिग्रेटेड) / एमसीए (इंटिग्रेटेड) या सात अभ्यासक्रमाच्या सीईटीची प्रवेश परीक्षा मंगळवार (२८ एप्रिल २०२६) पासून सुरु होत आहे. हि सीईटी २८ व २९ एप्रिल २०२६ या दोन दिवशी घेण्यात येणार आहे. या सात अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी राज्यात ३६ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर ७१,०६७ विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत.

बी.एचएमसीटी / बीसीए/ बीबीए / बीबीएम / बीएमएससाठी ७१ हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार

यावर्षी बी.एचएमसीटी / बीसीए/ बीबीए / बीबीएम / बीएमएस या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी ७१,०६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीमध्ये ३५५ अनाथ विद्यार्थी व ३२३ दिव्यांग विद्यार्थी ही सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत. २०२५ च्या बी.एचएमसीटी सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १४३६ व बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम/ एमबीए (इंटिग्रेटेड) / एमसीए (इंटिग्रेटेड) सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १,१२,९२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Education News: “विद्यार्थ्यांचे शुल्क ६% व्याजासह परत…”; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

या अभ्यासक्रमांसाठीची ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने होणार आहे. तसेच यापूर्वी बी.एचएमसीटी व बीसीए/ बीबीए / बीबीएम / बीएमएस या अभ्यासक्रमाच्या सीईटी स्वतंत्र घेण्यात येत होत्या. यावर्षीपासून दोन्ही अभ्यासक्रमाची एकच सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम हे अभ्यासक्रम पूर्वी पारंपारिक विद्यापीठाच्या अंतर्गत येत होते. २०२४ -२५ पासून हे अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अंतर्गत आले. व या अभ्यासक्रमास व्यावसायिक दर्जा देण्यात आला. यामुळे सीईटी कक्षाने या अभ्यासक्रमाची सीईटी घेण्यास सुरुवात केली. वर्ष २०२४ -२५ व २०२५-२६ मध्ये या अभ्यासक्रमाची दोनदा सीईटी घेण्यात आली. २०२४-२५ मध्ये दोन सीईटी मिळून १,०६,०१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर २०२५-२६ मध्ये १,१२,९२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Scholarship Examination 2026: 31 हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा; पण ‘हॉट संडे’मुळे विद्यार्थी आणि पालकांचे हाल!

Web Title: Maharashtra cet exam 2026 bca bba bms bhmct entrance test details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • Career News
  • CET Exam

संबंधित बातम्या

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
1

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
4

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.