31 हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा (Photo Credit- X)
यापूर्वी काही वर्षे ही परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेतली जात होती. तसेच २२ फेब्रुवारीला पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीही परीक्षा पार पडली होती. मात्र, चालू वर्षात बदल करून चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली आहे. दरम्यान, शिक्षणाधिकारी (प्राथ.) नीलेश गुंड यांनी सेंट ऊर्सुला गर्ल्स हायस्कूल व प्रॉव्हिडन्स गर्ल्स हायस्कूल येथील परीक्षा केंद्राला भेटी दिल्या, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर झोडे यांनी सोमलवार प्रायमरी स्कूल, कन्या हायस्कूल सीताबर्डी व सुळे हायस्कूल धंतोली येथे भेटी दिल्या. उपशिक्षणाधिकारी रमेश हरडे यांनी शहरातील काही केंद्रांवर भेटी दिल्या.
इयत्ता चौथीसाठी १९,९६० विद्यार्थी तर इयत्ता सातवीसाठी १२,६२६ विद्यार्थी बसले होते. परीक्षेसाठी जिल्ह्यातील २२८ केंद्रांपैकी चौथीसाठी १२९ तर सातवीसाठी ९९ केंद्रे निश्चित केली होती. परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत घेतली. मात्र, या वेळेमुळे भर उन्हात पालकांना केंद्राबाहेर थांबावे लागले. अनेक ठिकाणी सावली, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था यांचा अभाव असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. काही पालकांनी सांगितले की, उन्हाच्या तीव्रतेत लहान मुलांना परीक्षा देणे कठीण जाते. त्यातच परीक्षा केंद्रांवर मूलभूत सुविधा नसल्याने अडचणी
वाढतात. पुढील वर्षांपासून अशा परीक्षा सकाळी लवकर किंवा थंड वातावरणात घ्याव्या, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. खालील तक्त्यात इयत्ता चौथी आणि सातवीच्या उपस्थित विद्यार्थ्यांची आकडेवारी दिली आहे:
| तालुका | इयत्ता चौथी (हजर विद्यार्थी) | इयत्ता सातवी (हजर विद्यार्थी) |
| नागपूर (शहर) | ५,७३२ | ४,२१३ |
| नागपूर (ग्रामीण) | १,७३८ | ९७४ |
| हिंगणा | १,३५२ | ८२२ |
| सावनेर | १,१८४ | ७३७ |
| मौदा | १,०८५ | ६४० |
| कामठी | १,०६१ | ६०५ |
| रामटेक | १,०४८ | ६०२ |
| उमरेड | १,०१५ | ५६३ |
| काटोल | १,०१४ | ६५५ |
| कुही | ८६८ | ६०७ |
| नरखेड | ८२१ | ६७२ |
| पारशिवनी | ७३५ | ३४१ |
| भिवापूर | ६६७ | ४११ |
| कळमेश्वर | ५२८ | ७८४ |
परीक्षेची एकूण आकडेवारी:






