Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zp & Corporation School News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना उतरती कळा; पहिलीच्या पटसंख्येत मोठी घट!

Zp & Corporation School News: जिल्हा परिषद आणि मनपा शाळांची चिंता वाढली आहे. गेल्या ४ वर्षांत पहिलीचे तब्बल १.३७ लाख विद्यार्थी कमी झाले आहेत. डिजिटल सुविधा देऊनही पटसंख्या का घसरतेय? वाचा सविस्तर अहवाल...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 01, 2026 | 05:52 PM
school

school

Follow Us
Follow Us:

Zp & Corporation School News:  आपल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली वर्गाच्या पटसंख्येला गेल्या चार वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८ लाख १५ हजार इतकी होती.  ती  २०२५-२६ मध्ये ६ लाख ७७ हजार ३९९ वर घसरली आहे. परिणामी, अवघ्या चार वर्षांत तब्बल १ लाख ३७ हजार ६०६ विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना उतरती कळा

‘यूडायस प्लस’च्या आकडेवारीनुसार पहिलीत प्रवेश घेणााऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. २०२२-२३ ते २०२३-२४ या एका वर्षात ६९ हजार ३६६ विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. त्यानंतर २०२४-२५ आणखी ४६ हजार ९४६ कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे तर ही घट आता २०२५-२६ मध्ये ही दिसून येत असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत विद्यार्थी कमी होण्याचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून येते आहे.

11th Admission 2026: अकरावी प्रवेशाची पहिली फेरी अंतिम टप्प्यात; ‘या’ तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन!

सरकारी शाळांमधील पटसंख्या का घसरतेय?

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शिष्यवृत्ती, डिजिटल सुविधा असे अनेक उपक्रम राबवूनही अजूनही पटसंख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण हे पालकांचा आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालण्याचा अट्टाहास, स्थलांतर आणि घटता जन्मदर हे असल्याचे जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, आगामी शैक्षणिक वर्षात पहिलीची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना विशेष मोहीमा राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांच्या परिसरातील अंगणवाडी तसेच बालवालड्यांना भेटी देणे, प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, पालकांशी थेट संपर्क साधणे किंवा शाळांमधील सुविधा व उपक्रमांची माहिती पोहचवणे यावर भर देण्यात आला आहे. तसेच नाविण्यपूर्ण जाहिराती आणि सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी मिळवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, तरीही गेल्या काही वर्षात जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये कोट्यावधींचा निधी खर्च करूनही विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र केंद्र सरकारच्या अहवालातून समोर आले आहे.

Mumbai BLO News: निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवणार! गैरहजर कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे निर्देश

Web Title: Maharashtra school news class 1 enrolment drops udise plus report education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Alert Schools
  • ZP School

संबंधित बातम्या

Maharashtra School: शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘हे’ अभियान सुरू होणार
1

Maharashtra School: शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘हे’ अभियान सुरू होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.