फोटो सौजन्य- सोशल मीडिया
राज्यातील एकूण १,५९१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ८ लाख ८७ हजार २६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील भाग-१ (नोंदणी) आणि भाग-२ (महाविद्यालय पसंतीक्रम) पूर्ण केला आहे.
पहिल्या प्रवेश फेरीत १ लाख ७१ हजार ५४५ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालये निश्चित केली आहेत. त्यापैकी १ लाख ५५ हजार ९५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील (कॅप) तसेच व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशांचा समावेश आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश निश्चित केलेला नाही, त्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन ३ जून २०२६ पर्यंत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. तसेच विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या मुदतीची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
| अ क्र | विभाग | विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या |
|---|---|---|
| 1 | अमरावती | १८,२२६ |
| 2 | छ. संभाजीनगर | १६,८०९ |
| 3 | कोल्हापूर | २०,३०८ |
| 4 | लातूर | १०,१४३ |
| 5 | मुंबई | २४,५६३ |
| 6 | नागपूर | २४,४१९ |
| 7 | नाशिक | २१,३७० |
| 8 | पुणे | ३५,७०७ |
| 9 | एकूण | १,७१,१४५ |






