Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Election :नेतान्याहूंच्या सत्तेची परीक्षा; इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणूक

Israel Election : इस्रायलमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत असून पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासमोर माजी लष्करप्रमुख गादी आयझेनकोट यांचे आव्हान आहे. गाझा युद्ध, इराण संघर्ष आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 27, 2026 | 06:56 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • नेतान्याहूंसमोर माजी लष्करप्रमुखांचे आव्हान
  • युद्ध आणि सुरक्षेचे मुद्दे केंद्रस्थानी
  • सत्तास्थापनेसाठी ६१ जागांचे गणित महत्त्वाचे
Israel Election :मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती, गाझामधील संघर्ष आणि इराणसोबतच्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये आज (२७ ऑक्टोबर) सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची मोठी परीक्षा मानली जात आहे. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या हल्ल्यानंतर देशात प्रथमच सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जवळपास तीन वर्षांच्या युद्धानंतर इस्रायली नागरिक नेतान्याहू यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवणार की सत्तांतराच्या बाजूने कौल देणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

नेतान्याहूंसमोर माजी लष्करप्रमुखांचे आव्हान

या निवडणुकीत नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षासमोर माजी लष्करप्रमुख गादी आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाचे मोठे आव्हान आहे. नेतान्याहू हे इस्रायलमधील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नेते आहेत. मात्र, हमासचा हल्ला रोखण्यात आलेले अपयश, गाझामधील दीर्घकाळ सुरू असलेले युद्ध आणि इराणसोबतचा संघर्ष यामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुसरीकडे, आयझेनकोट यांनी देशाच्या सुरक्षाव्यवस्थेत बदल, लष्करी धोरणांचे पुनरावलोकन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलची प्रतिमा सुधारण्याचे आश्वासन दिले आहे.

Ethiopia News : इथिओपियात चर्चवर सशस्त्र हल्ले; ४० हून अधिक जणांचा मृत्यू

युद्ध आणि सुरक्षेचे मुद्दे केंद्रस्थानी

या निवडणुकीत मतदारांसमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. गाझामधील युद्ध, हमासच्या हल्ल्यानंतरची सुरक्षा व्यवस्था, इराणसोबतचा संघर्ष, लेबनॉनमधील लष्करी कारवाया आणि पॅलेस्टिनी प्रदेशातील परिस्थिती या मुद्द्यांचा निवडणुकीवर मोठा प्रभाव पडत आहे.

याशिवाय लष्करी सेवेतून काही धार्मिक समुदायांना मिळणाऱ्या सवलती, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि देशातील लोकशाही संस्थांची स्थिती हे विषयही प्रचारात चर्चेत आहेत. सात लाखांहून अधिक नागरिक मतदानासाठी पात्र असून मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यातही मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून आला आहे.

India-China Border Tension: भारतानेही करारांचा आदर करावा…; सीमावादावर चीनची पहिली प्रतिक्रीया

सत्तास्थापनेसाठी ६१ जागांचे गणित महत्त्वाचे

इस्रायलच्या संसदेत म्हणजेच नेसेटमध्ये एकूण १२० जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी किमान ६१ जागांचे बहुमत आवश्यक आहे. देशात प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निवडणूक होत असल्याने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण मानले जाते. त्यामुळे लहान पक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते.

मतदान संपल्यानंतर प्राथमिक अंदाज समोर येतील; मात्र अंतिम निकाल आणि सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होण्यासाठी काही दिवस लागू शकतात. अधिकृत निकाल ४ नोव्हेंबरला जाहीर होण्याची अपेक्षा आहे. नेतान्याहू पुन्हा सत्तेत येणार की इस्रायलमध्ये नेतृत्वबदल होणार, याचा निर्णय या निवडणुकीतून होणार आहे.

Web Title: Israel election 2026 netanyahu gadi eisenkot political challengecp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • Marathi News

संबंधित बातम्या

Baramati News : अनेकांत शिक्षण संस्थेचा आधारवड हरपला! जवाहर शाह (वाघोलीकर) यांचे निधन
1

Baramati News : अनेकांत शिक्षण संस्थेचा आधारवड हरपला! जवाहर शाह (वाघोलीकर) यांचे निधन

Imran Khan: इमरान खानला हायकोर्टाचा दिलासा, भारत सोडण्याच्या नोटीसवर तात्पुरती ब्रेक,न्यायालयात नेमकं काय घडलं?
2

Imran Khan: इमरान खानला हायकोर्टाचा दिलासा, भारत सोडण्याच्या नोटीसवर तात्पुरती ब्रेक,न्यायालयात नेमकं काय घडलं?

Ethiopia News : इथिओपियात चर्चवर सशस्त्र हल्ले; ४० हून अधिक जणांचा मृत्यू
3

Ethiopia News : इथिओपियात चर्चवर सशस्त्र हल्ले; ४० हून अधिक जणांचा मृत्यू

Top Casting Directors: हॉलिवूड ते बॉलिवूड! मोठ्या चित्रपटांची स्टारकास्ट घडवणारे ‘मास्टरमाइंड’ कोण?
4

Top Casting Directors: हॉलिवूड ते बॉलिवूड! मोठ्या चित्रपटांची स्टारकास्ट घडवणारे ‘मास्टरमाइंड’ कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.