Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

11th Admission: ११ वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; तब्बल ‘इतके’ प्रवेश झाले निश्चित

राज्यात अकरावी प्रत्यक्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अखेर ४ लाख ४५ हजार ९१६ इतकी आहे. यापैकी ३ लाख ७१ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी कॅप अंतर्गत प्रवेश केला असून, ७४ हजार ४३२ विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत प्रवेश घेत

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 08, 2025 | 08:20 PM
११ वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

११ वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय, पुणे अंतर्गत इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी नियमित फेरी-२चे वेळापत्रक जाहीर झाले असून, १० जुलै २०२५ पासून ही फेरी सुरू होत आहे. यामध्ये विद्यार्थी नवीन नोंदणी करू शकतात किंवा अर्जाच्या भाग-१ मध्ये आवश्यक दुरुस्ती करू शकतात. या फेरीत विद्यार्थी १ ते १० पर्यंतच्या प्राधान्यक्रमानुसार उच्च माध्यमिक विद्यालयांची निवड करू शकतात.

या फेरीमध्ये नियमित फेरी-१ मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंती आणि प्रवाहात बदल करण्याची संधी दिली जाणार आहे. अर्ज भरून सुधारणा करण्याची अंतिम मुदत १३ जुलै २०२५ सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.

11th Admission: अकरावी प्रथम फेरीअंतर्गत प्रवेशाकरिता शेवटचे दोन दिवस बाकी; कॅप अंतर्गत ‘इतके’ प्रवेश निश्चित

१७ जुलै २०२५ रोजी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये कॉलेज वाटपाची माहिती मिळणार असून, SMS द्वारे देखील त्यांना याची सूचना दिली जाणार आहे. त्यानंतर, १८ जुलै ते २१ जुलै २०२५ दरम्यान विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. याच कालावधीत विद्यालयांनी कोटानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.

२३ जुलै २०२५ रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर कोटांतर्गत पात्र विद्यार्थ्यांना संपर्क साधून त्यांच्या प्रवेशासंदर्भात कार्यवाही पूर्ण केली जाईल.

संपूर्ण प्रक्रिया वेळापत्रकानुसार पार पाडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी, पालकांनी व विद्यालयांनी प्रत्येक टप्प्याचे वेळेत पालन करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

पुणे विभागातील ७ जुलै अखेर प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या

पुणे जिल्हा – ४५५०५
सोलापूर जिल्हा – २०६३१
अहिल्यानगर जिल्हा -२४६८७
एकूण पुणे विभाग -९०८२३

अकरावी प्रथम फेरीअंतर्गत प्रवेशाकरिता शेवटचे दोन दिवस बाकी

 

 राज्यात अकरावी प्रत्यक्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अखेर ४ लाख ४५ हजार ९१६ इतकी आहे. यापैकी ३ लाख ७१ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी कॅप अंतर्गत प्रवेश केला असून, ७४ हजार ४३२ विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत प्रवेश घेतला आहे. प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत ७ जुलै, म्हणजेच शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनी मुदतीच्या आत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. अशे आव्हान शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले.
यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात केंद्रीय आणि ऑनलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये एकूण नऊ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांच्या एकूण १९ हजार ३२४ शाखा आहेत. कॅप प्रथम फेरीअंतर्गतची निवड यादी दि. १८ जून रोजी घोषित झाली आहे. यंदा कनिष्ठ महाविद्यालयांच्या ९०२० शाखांमध्ये त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश अर्ज आले असून, उर्वरित १० हजार ३०४ नियमित फेरी-२ मधील अर्जाचा भाग-२ पसंतीक्रम देण्याची सुविधा दि. १० ते १३ जुलै दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

Web Title: Maharashtra state 11 th admission declare timetable admissions confirmed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • Maharashtra student

संबंधित बातम्या

10 वी पास उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरी, सिक्युरिटी असिस्टंट ट्रान्सपोर्टसाठी ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
1

10 वी पास उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरी, सिक्युरिटी असिस्टंट ट्रान्सपोर्टसाठी ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

BEML मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 10वी उत्तीर्ण उमेदवारांना देणार नियुक्ती
2

BEML मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 10वी उत्तीर्ण उमेदवारांना देणार नियुक्ती

Supreme Court Recruitment 2025 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी, पगार ६७००० पेक्षा जास्त, कसे कराल अर्ज?
3

Supreme Court Recruitment 2025 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी, पगार ६७००० पेक्षा जास्त, कसे कराल अर्ज?

Railway Recruitment: 2000 पेक्षा अधिक जागांवर भरती! परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, कशी ते घ्या जाणून
4

Railway Recruitment: 2000 पेक्षा अधिक जागांवर भरती! परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, कशी ते घ्या जाणून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.