Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra TET Paper Leak: टीईटी पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे बिहारमध्ये; ‘या’ मुख्य आरोपीच्या पत्नीला पाटणातून करण्यात आली अटक

Maharashtra TET Paper Leak: टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यास कारणीभूत ठरलेल्या पेपर लीक घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण? बिहार आणि हरियाणापर्यंत पसरलेल्या या रॅकेटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती कडक कारवाई करणार? जाणून घ्या सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 30, 2026 | 12:18 PM
paper leak

paper leak

Follow Us
Follow Us:

Maharashtra TET Paper Leak 2026 Latest News: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ च्या पेपर लीक प्रकरणाशी संबंधित एका मोठ्या कारवाईत ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपीच्या पत्नीला बिहारमधील पाटणा येथून अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपी महिला सुमन कुमारी असून, ती या प्रकरणातील संशयित आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी आहे.

यापूर्वी, महाराष्ट्र टीईटी २०२६ पेपर लीकचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) या घोटाळ्यामागील आंतरराज्यीय नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. बिहारमधील एक रहिवासी या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार असल्याचे ‘एसआयटी’च्या सूत्रांनी सांगितले होते.

तपास यंत्रणा इतर राज्यांमध्ये सक्रीय

‘एसआयटी’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेपर लीकमध्ये सामील असलेला आणखी एक मुख्य आरोपी हरियाणात असल्याचे आढळून आला असून, विविध राज्यांमध्ये तपास सुरू आहे. दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना रविवारी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सरकारी वकील अ‍ॅडव्होकेट मारिया अन्सारी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास ६ जुलैपर्यंत सुरू राहील आणि तोपर्यंत महाराष्ट्रातील मुख्य आरोपीला न्यायालयात हजर केले जाईल. अन्सारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “६ जुलैपर्यंत तपास सुरू राहील आणि पथकाला तोपर्यंत चौकशी पूर्ण करावी लागेल. महाराष्ट्रातील मुख्य आरोपीला त्या तारखेपर्यंत न्यायालयात सादर केले जाईल. तसेच, आरोपींपैकी एकावर वैद्यकीय उपचारही करण्यात आले आहेत.”

UGC NET June 2026: यूजीसी नेट परीक्षा आज संपणार; यूजीसी नेट परीक्षेचा आज शेवटचा दिवस; ‘या’ दिवशी जाहीर होऊ शकतो अंतिम निकाल

गुप्त माहितीच्या आधारे धाड आणि परीक्षा पुढे ढकलली

भिवंडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे यापूर्वी एका ठिकाणी धाड टाकून टीईटी पेपर लीक प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले होते, ज्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, धाडीदरम्यान प्रश्नपत्रिकांचे अनेक संच जप्त करण्यात आले होते आणि त्यांची पडताळणी केली असता परीक्षा साहित्य लीक झाल्याची पुष्टी झाली. यानंतर ठाणे पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले.

‘मकोका’ अंतर्गत कडक कारवाईची तयारी

या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुख्य सुत्रधारांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (MCOCA – मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Sharmistha Mukherjee : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी नक्की किती शिकल्या आहेत? जाणून घ्या सविस्तर..

भिवंडीत पोलिसांच्या तपासादरम्यान प्रश्नपत्रिका लीक झाल्याची बाब समोर आल्यानंतर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २८ जून रोजी राज्यभरात होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता, असे परिषदेने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Maharashtra tet paper leak 2026 sit investigation mcoca action thane police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Chief Minister Eknath Shinde
  • Paper Leak Case
  • TET

संबंधित बातम्या

‘शिक्षणमंत्री राजीनामा द्या, अध्यक्ष राजीनामा द्या’! ‘टीईटी’ पेपरफुटीच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटनांचे जोरदार आंदोलन
1

‘शिक्षणमंत्री राजीनामा द्या, अध्यक्ष राजीनामा द्या’! ‘टीईटी’ पेपरफुटीच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटनांचे जोरदार आंदोलन

Paper Leak Cases: गेल्या काही वर्षांत ‘या’ मोठ्या परीक्षांना बसला पेपर लीकचा डाग; लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर
2

Paper Leak Cases: गेल्या काही वर्षांत ‘या’ मोठ्या परीक्षांना बसला पेपर लीकचा डाग; लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर

TET Paper Leak: उमेदवारांचा कोणताही दोष नाही…; रद्द झालेल्या परीक्षेबाबत उपायुक्त प्रिया शिंदे यांची मोठी घोषणा
3

TET Paper Leak: उमेदवारांचा कोणताही दोष नाही…; रद्द झालेल्या परीक्षेबाबत उपायुक्त प्रिया शिंदे यांची मोठी घोषणा

TET Exam Cancelled: उद्या होणारी टीईटी परीक्षा खरोखरच रद्द! पेपर फुटल्याच्या वृत्ताने उमेदवारांमध्ये निर्माण झाला संताप
4

TET Exam Cancelled: उद्या होणारी टीईटी परीक्षा खरोखरच रद्द! पेपर फुटल्याच्या वृत्ताने उमेदवारांमध्ये निर्माण झाला संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.