Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन

Major Rishabh Singh Sambyal: राष्ट्रपतींचे माजी एडीजी आणि 'नॅशनल क्रश' म्हणून प्रसिद्ध असलेले पूर्व मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी फॅशन इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे. सोशल मीडियावर आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाने आणि शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी थेट फॅशन आणि स्ट्रीटवेअरच्या जगतात पाऊल ठेवले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 03, 2026 | 04:32 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल!
  • ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन
  • फौजी आणि फॅशनचे हे कोलॅबोरेशन का खास आहे?
Major Rishabh Singh Sambyal: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे एडीसी राहिलेले भारतीय सेनेचे पूर्व मेजर ऋषभ सिंह सांब्याल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अवघ्या ३० व्या वर्षी सेनेतून वेळेपूर्वीच निवृत्ती घेऊन सर्वाना थक्क करणारे मेजर सांब्याल यांनी आपल्या आयुष्याच्या नवीन आणि ग्लॅमरस पर्वाला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाने आणि शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी थेट फॅशन आणि स्ट्रीटवेअरच्या जगतात पाऊल ठेवले आहे.

फॅन्समध्ये ‘नॅशनल क्रश’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऋषभ सिंह सांब्याल यांनी मुंबईच्या लोकप्रिय लग्जरी स्ट्रीटवेअर ब्रँड ‘बॉन्कर्स कॉर्नर’सोबत कोलॅबोरेशन केले आहे. ब्रँडच्या वेबसाइटवर आणि सोशल मीडिया हँडलवर ‘MAJ RISHABH (RETD.) X BONKERS’ या नावाने कलेक्शन गाजत आहे. २४ वर्षांची प्रसिद्ध अभिनेत्री आणि ब्रँड आंबॅसिडर अनुष्का सेनसोबत त्यांचे फोटोशूट आणि प्रमोशनल व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. देशसेवेनंतर फॅशन इंडस्ट्रीत आपली छाप सोडणारे ऋषभ सिंह सांब्याल कोण आहेत, ते जाणून घेऊया.

सेनेच्या वर्दीपासून फॅशनच्या जगापर्यंतचा प्रवास

ऋषभ सिंह सांब्याल हे जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील डोगरा राजपूत लष्करी कुटुंबातील आहेत. २०१३ मध्ये एनडीए (NDA) ट्रेनिंगनंतर ते भारतीय सेनेत सामील झाले. सुमारे १२ वर्षांच्या सेवाकाळात ते जाट रेजिमेंटचा भाग राहिले आणि २०२१ च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये ‘बेस्ट मार्चिंग कंटिंजेंट’चे नेतृत्व केले. ते सेनेच्या सर्वात घातक युनिट ‘4 पॅरा स्पेशल फोर्सेज’चा भाग होते. तिथे त्यांनी प्रतिष्ठित ‘बलिदान बॅज’ मिळवला. मार्च २०२३ मध्ये ते राष्ट्रपतींचे एडीजी बनले, परंतु पारिवारिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी लवकर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

सेनेतून बाहेर पडल्यानंतर मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी कंटेंट क्रिएशन आणि मोटिव्हेशनल स्पीकिंगमध्ये हात आजमावला. बॉन्कर्स कॉर्नरच्या नवीन कॅम्पेनमध्ये ते अभिनेत्री अनुष्का सेन, शार्क टँक फेम नमिता थापर आणि फाउंडर शुभम गुप्ता यांच्यासोबत दिसत आहेत. या ॲड कॅम्पेनची थीम ‘कमाई का फल, उधार का नहीं’ ही बनावट उत्पादनांविरुद्ध खरी मेहनत आणि उपलब्धतेचा संदेश देते. फोटोशूटमधील सांब्याल यांचा फौजी थाट आणि स्टाईल पाहून चाहते त्यांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा सल्ला देत आहेत.

CBSE Marksheet Issue: सीबीएसई बोर्डाच्या अजब कारभारामुळे विद्यार्थ्याच्या भविष्यावर संकट; नेमका प्रकार काय?

फौजी आणि फॅशनचे हे कोलॅबोरेशन का खास आहे?

मिलिट्री डिसिप्लिन, स्पेशल फोर्सेसचा ॲटिट्यूड आणि युथ फॅशनचा हा मेळ भारतीय स्ट्रीटवेअर मार्केटसाठी नवीन ट्रेंड सेट करत आहे. ‘शार्क टैंक इंडिया’कडून फंडेड असलेला बॉन्कर्स कॉर्नर अनेकदा सांस्कृतिक आणि चर्चेतील चेहऱ्यांना आपल्यासोबत जोडतो. मेजर सांब्याल यांच्यासारख्या शिस्तप्रिय व्यक्तीला ब्रँडशी जोडणे तरुणांना आकर्षित करत आहे. मॉडेलच्या भूमिकेत उतरलेले मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांचे हे पाऊल सिद्ध करते की, शिस्त आणि स्टाइलचा संगम कोणत्याही नवीन वाटेला सोपे करू शकतो.

Navdurga Puraskar 2026: कला, क्रीडा ते समाजसेवा… पुण्यात कर्तृत्ववान महिलांना ‘नवदुर्गा पुरस्काराने’ सन्मानित

💡

Frequently Asked Questions

  • Que: मेजर ऋषभ सिंह सांब्याल कोण आहेत आणि ते का चर्चेत आले आहेत?

    Ans: मेजर ऋषभ सिंह सांब्याल हे भारतीय सेनेच्या '४ पॅरा स्पेशल फोर्सेस'चे माजी अधिकारी व राष्ट्रपतींचे माजी एडीसी (ADC) आहेत. त्यांनी अवघ्या ३० व्या वर्षी सेनेतून निवृत्ती घेऊन फॅशन व स्ट्रीटवेअर जगतात पदार्पण केल्यामुळे ते चर्चेत आहेत.

  • Que: मेजर ऋषभ सांब्याल यांनी भारतीय सेनेमध्ये कोणती महत्त्वपूर्ण पदे भूषवली आहेत?

    Ans: त्यांनी जाट रेजिमेंटचा भाग राहून २०२१ च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये 'बेस्ट मार्चिंग कंटिंजेंट'चे नेतृत्व केले होते. तसेच त्यांनी ४ पॅरा स्पेशल फोर्सेसमध्ये सेवा बजावून प्रतिष्ठित 'बलिदान बॅज' प्राप्त केला होता.

  • Que: मेजर सांब्याल यांनी सेनेतून वेळेपूर्वी निवृत्ती का घेतली?

    Ans: मार्च २०२३ मध्ये राष्ट्रपतींचे एडीसी म्हणून कार्यरत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी सेनेतून वेळेपूर्वीच निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: Major rishabh singh sambyal fashion brand collaboration sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Career
  • job news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
1

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Siddharth Gupta Birthday Special: वाढदिवशी खास चर्चा! ‘कृष्णावतारम्’मधील श्रीकृष्णाच्या भूमिकेने सिद्धार्थ गुप्ताला दिली नवी ओळख
2

Siddharth Gupta Birthday Special: वाढदिवशी खास चर्चा! ‘कृष्णावतारम्’मधील श्रीकृष्णाच्या भूमिकेने सिद्धार्थ गुप्ताला दिली नवी ओळख

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद
3

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद

CBSE Marksheet Issue: सीबीएसई बोर्डाच्या अजब कारभारामुळे विद्यार्थ्याच्या भविष्यावर संकट; नेमका प्रकार काय?
4

CBSE Marksheet Issue: सीबीएसई बोर्डाच्या अजब कारभारामुळे विद्यार्थ्याच्या भविष्यावर संकट; नेमका प्रकार काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.