Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Nagpur News : नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. दोन आरोपींना अटक करून एमजी हेक्टर वाहन, मोबाईल आणि रोख रकमेसह २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 03, 2026 | 04:04 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
  • दोन आरोपींना अटक; चोरीची कबुली
  • टँकरचालकांना चोरीच्या ऑईलची विक्री; २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nagpur News : नागपूर ग्रामीण भागात महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २१ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चोरीचे ऑईल महामार्गावरून जाणाऱ्या टँकरचालकांना विकले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई

महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. याचदरम्यान पोलिसांना या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पांढऱ्या रंगाच्या एमजी हेक्टर वाहनाचा वापर होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

वडोदा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनाचा शोध सुरू केला. शुक्रवारी नागपूरमधील पाटणकर चौक येथे एमएच ०५/ईक्यू-९२८२ क्रमांकाचे वाहन पोलिसांनी अडवले. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद

दोन आरोपींना अटक; चोरीची कबुली

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रमणदासिंग अमृतसिंग रणधावा (४०) आणि कमल रामस्वरूप शर्मा (५५) हे दोघे आढळून आले. दोघेही नागपूरमधील बाबादीप नगर परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल चोरी केल्याची कबुली दिली.

वडोदा आणि मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी चोरीचे प्रकार केल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे ग्रामीण भागातील ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटनांचा तपास आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

Maharashtra Dengue News: नागपुरात डॉक्टर-विद्यार्थ्यांना लागण, तर सोलापूरमध्ये आठ वर्षीय बालकाचा मृत्यू!

टँकरचालकांना चोरीच्या ऑईलची विक्री; २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपी ट्रान्सफॉर्मरमधून चोरी केलेले ऑईल महामार्गावरून ये-जा करणाऱ्या टँकरचालकांना विकत असल्याची माहिती चौकशीत मिळाली. या व्यवहारातून मिळालेली रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपींकडून २० लाख रुपये किमतीचे एमजी हेक्टर वाहन, २० हजार रुपये किमतीचे दोन अँड्रॉइड मोबाईल आणि ऑईल विक्रीतून मिळालेले १ लाख ५५ हजार रुपये रोख असा एकूण २१ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Web Title: Url slug nagpur transformer oil theft two arrested 21 lakh seizedcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News
  • Nagpur Police
  • Theft Case

संबंधित बातम्या

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन
1

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन

Siddharth Gupta Birthday Special: वाढदिवशी खास चर्चा! ‘कृष्णावतारम्’मधील श्रीकृष्णाच्या भूमिकेने सिद्धार्थ गुप्ताला दिली नवी ओळख
2

Siddharth Gupta Birthday Special: वाढदिवशी खास चर्चा! ‘कृष्णावतारम्’मधील श्रीकृष्णाच्या भूमिकेने सिद्धार्थ गुप्ताला दिली नवी ओळख

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद
3

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद

Maharashtra Dengue News: नागपुरात डॉक्टर-विद्यार्थ्यांना लागण, तर सोलापूरमध्ये आठ वर्षीय बालकाचा मृत्यू!
4

Maharashtra Dengue News: नागपुरात डॉक्टर-विद्यार्थ्यांना लागण, तर सोलापूरमध्ये आठ वर्षीय बालकाचा मृत्यू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.