Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद

Nagpur News : दिवाळीच्या खरेदीसाठी नागपूरच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. मात्र, अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि नियोजनाच्या अभावामुळे महाल, इतवारी, गांधीबागसह अनेक भागांत वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 03, 2026 | 03:36 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगचा बाजारपेठांना विळखा
  • मिशन १०० डेजनंतरही अतिक्रमणावर ठोस कारवाई नाही
  • वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त; नियोजनाचा अभाव उघड
Nagpur News : दिवाळीचा सण जवळ येताच नागपूरच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, या उत्साहावर वाहतूक कोंडीचे विरजण पडत आहे. अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहरातील व्यापारी भागांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. दरवर्षी उद्भवणारी हीच समस्या यंदाही कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगचा बाजारपेठांना विळखा

महाल, इतवारी, गांधीबाग, बडीं, जरीपटका, सदर, धरमपेठ आणि सतरंजीपुरा या प्रमुख व्यापारी भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. रस्ते आणि पदपथांवर अनधिकृत दुकानदार तसेच विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यातच रस्त्यांच्या कडेला होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहनांसाठी उपलब्ध जागा कमी झाली आहे.

परिणामी दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही वाहनांची गर्दी आणि अरुंद रस्त्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Nagpur News : दिवाळीत घरी येणे महागणार हवाई प्रवासाचे भाडे ११ ते १७ हजारांवर; बसचे तिकीटही ५ हजारांवर

मिशन १०० डेजनंतरही अतिक्रमणावर ठोस कारवाई नाही

महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी ‘मिशन १०० डेज’ सुरू केले आहे. मात्र, दिवाळीपूर्वी बाजारपेठांमधील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येत अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. मध्य नागपूरचे माजी नगरसेवक संजय बालपांडे यांनी अतिक्रमणविरोधी पथकाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

त्यांनी सांगितले की, हा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता. महापौर नीता ठाकरे यांनीही कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत प्रशासनाची भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Maharashtra Dengue News: नागपुरात डॉक्टर-विद्यार्थ्यांना लागण, तर सोलापूरमध्ये आठ वर्षीय बालकाचा मृत्यू!

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त; नियोजनाचा अभाव उघड

शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा प्रवास अधिकच त्रासदायक झाला आहे. विनोद जेठानी यांनी याबाबत नाराजी व्यक्त करताना सांगितले की, शहरात कोणत्याही मार्गाने प्रवास करायचा असल्यास तासनतास लागतात. विशेषतः संध्याकाळच्या वेळी बाजारपेठेत जाणे डोकेदुखी बनले आहे.

दुसरीकडे, वेणुगोपाल अग्रवाल यांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले. दरवर्षी दिवाळीत बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होणार हे माहीत असतानाही आधीच उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची अतिरिक्त नियुक्ती, अतिक्रमण हटविण्याची मोहीम आणि वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक आहे. अन्यथा सणासुदीच्या काळात नागपूरकरांना वाहतूक कोंडीचा आणखी मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

Web Title: Nagpur diwali shopping traffic congestion marketscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • Marathi News
  • Nagpur News
  • Traffic Issue

संबंधित बातम्या

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन
1

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
2

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Siddharth Gupta Birthday Special: वाढदिवशी खास चर्चा! ‘कृष्णावतारम्’मधील श्रीकृष्णाच्या भूमिकेने सिद्धार्थ गुप्ताला दिली नवी ओळख
3

Siddharth Gupta Birthday Special: वाढदिवशी खास चर्चा! ‘कृष्णावतारम्’मधील श्रीकृष्णाच्या भूमिकेने सिद्धार्थ गुप्ताला दिली नवी ओळख

Eye Safety During Diwali: सावध राहा, सुरक्षित साजरा करा दिवाळी! फटके फोडताना डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने घ्या काळजी
4

Eye Safety During Diwali: सावध राहा, सुरक्षित साजरा करा दिवाळी! फटके फोडताना डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने घ्या काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.