Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Engineering Admission: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली कॅप राउंड यादी जाहीर! १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना संधी

Engineering Admission News: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली कॅप राउंड यादी जाहीर! १.५७ लाख विद्यार्थ्यांना मिळाले कॉलेज. प्रवेश निश्चित करण्यासाठी ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान मुदत; वाचा सविस्तर वेळापत्रक.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 02, 2026 | 08:47 PM
Engineering Admission: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली कॅप राउंड यादी जाहीर! १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना संधी
Follow Us
Follow Us:
  • १६ हजार ६१५ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय
  • पहिल्या फेरीसाठी २ लाख १९ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी दाखविली पसंती
  • पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची संख्या : २ लाख ४४ हजार ०९७
(नीता परब) मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात आली. या पहिल्या यादीत २ लाख १९ हजार ४१७ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तसेच पहिल्या यादीमध्ये १६ हजार ६१५ विद्यार्थांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

राज्यात पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादीतील २ लाख ४४ हजार ०९७ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी विद्यार्थांना दिलेल्या मुदतीत २ लाख १९ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार पहिल्या कॅप फेरीच्या यादीसाठी करण्यात आला. या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५७ हजार १०३ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत विविध पसंतीक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश उपलब्ध झाले आहेत. यामध्ये ९८ हजार ०२४ विद्यार्थी असून ५९ हजार ०७९ विद्यार्थिनी आहेत.

PMO Officer Salary 2026: पंतप्रधान कार्यालयात नोकरी कशी मिळते? किती असतो पगार अन् कोणत्या सुविधा मिळतात? जाणून घ्या

१६ हजार ६१५ विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

१६ हजार ६१५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. यांचे प्रवेश ऑटो फ्रिज झाले आहेत. या विद्यार्थ्याना या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. या विद्यार्थ्यांनी जर काही कारणाने हा प्रवेश नाकारला तर या विद्यार्थ्यांना दुसऱ्या,तिसऱ्या व चौथ्या फेरीत उतरता येणार नाही. त्यांना थेट त्यानंतरच्या खुल्या फेरीत म्हणजे संस्थात्मक फेरीत उतरावे लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांनी आता ३ ते ५ ऑगस्ट २०२६ दरम्यान मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

दुसरी यादी कधी?

यानंतर ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुसऱ्या फेरीसाठी तात्पुरत्या रिक्त जागा जाहीर करण्यात येणार आहेत. राज्यात ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १११ अभ्यासक्रम उपलब्ध असून पहिल्या फेरीसाठी २ लाख १ हजार ०१३ जागा उपलब्ध आहेत. यावर्षी सर्वात जास्त जागा संगणक अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाच्या असून ३० हजार ९९३ जागा उपलब्ध असल्याचे सीईटी कक्षाकडून कळविण्यात आले आहे.

MBBS Admission 2026: वैद्यकीय प्रवेशासाठी समुपदेशनाची तारीख ठरली! चॉईस लॉक करताना ‘या’ चुका टाळा

Web Title: Mht cet engineering admission 2026 cap round 1 result declared marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Career News
  • education news
  • Engineering
  • Engineering College

संबंधित बातम्या

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
1

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र
2

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

NLSIU Fellowship: पदवीधरांना महिन्याला मिळणार रू. 50000 ची फेलोशिप, 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज
4

NLSIU Fellowship: पदवीधरांना महिन्याला मिळणार रू. 50000 ची फेलोशिप, 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.