Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

AIIMS INI-CET 2027 Exam: एम्सने आयएनआय-सीईटी जानेवारी २०२७ साठी नोंदणी सुरू केली आहे. ही परीक्षा कधी केव्हा आणि कुठे होणार आहे, संपूर्ण माहिती, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 18, 2026 | 06:16 PM
AIIMS INI-CET 2027 Exam

AIIMS INI-CET 2027 Exam

Follow Us
Follow Us:
  • PG मेडिकल प्रवेशासाठी नोंदणी सुरू
  • अर्जाची अंतिम तारीख कधी?
  • १ नोव्हेंबरला परीक्षा
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्लीने, INI-CET जानेवारी २०२७ सत्रासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही परीक्षा एम्स नवी दिल्लीसह देशभरातील विविध राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांमध्ये एमडी, एमएस, एम.सी.एच., डीएम आणि एमडीएस यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. इच्छुक आणि पात्र उमेदवार एम्सच्या वेबसाइटद्वारे aiimsexams.ac.in अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ ऑक्टोबर २०२६ आहे. ही परीक्षा १ नोव्हेंबर २०२६ रोजी संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल.

Agniveer Job Plan: अग्निवीरांसाठी मोठी बातमी! ४ वर्षे पूर्ण होण्याआधीच नोकरीची संधी? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

१३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

उमेदवारांनी INI-CET जानेवारी २०२७ सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया १३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, उमेदवार १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतील. अंतिम ऑनलाइन नोंदणीची स्थिती आणि प्रवेशपत्र २६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केले जाईल.

परीक्षा केव्हा होणार?

आयएनआय-सीईटी ( INI-CET) २०२७ परीक्षा १ नोव्हेंबर २०२६ रोजी घेतली जाईल. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेद्वारे एमडी (MD), एमएस (MS), एम.सीएच. (MCh), डीएम(DM) आणि एमडीएस (MDS) यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल.

परीक्षेचा पॅटर्न

आयएनआय-सीईटी २०२७ परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल. उमेदवारांना एकूण २०० वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. हे सर्व प्रश्न पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना ३ तास (१८० मिनिटे) मिळतील. मार्किम स्कीमनुसार, प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण दिला जाईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातील. याचा अर्थ असा की, उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देताना काळजी घेणे आवश्यक आहे, कारण चुकीच्या उत्तरांमुळे गुण कमी होतील. परंतु, न सोडवलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही गुण किंवा गुणकपात केली जाणार नाही.

अर्ज शुल्क किती?

सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांना आयएनआय-सीईटीसाठी ४,००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३,२०० रुपये आहे. शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन भरता येईल.

आयएनआय-सीईटी २०२७ साठी अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम एम्सच्या aiimsexams.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
  • यानंतर तुम्हाला INI-CET नोंदणी लिंकवर क्लिक करून संबंधित कोर्स निवडावा लागेल.
  • उमेदवाराला जन्मतारीख, प्रवर्ग, ईमेल आयडी यांसारखी माहिती भरून नोंदणी करावी लागेल.
  • यानंतर नोंदणीचा तपशील नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर पाठवला जाईल.
  • यानंतर, अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि आवश्यक छायाचित्रे निर्धारित फॉरमॅटमध्ये अपलोड करावी लागतील.
  • त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन माध्यमातून अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा लागेल.
  • अर्ज पूर्ण केल्यानंतर, उमेदवाराने कन्फ्रमेशन पेज डाउनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवावे.
NLSIU Fellowship: पदवीधरांना महिन्याला मिळणार रू. 50000 ची फेलोशिप, 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज

Web Title: Aiims ini cet 2027 registration exam date fee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • AIIMS
  • Career
  • Career News
  • CET Exam

संबंधित बातम्या

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
1

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

AI मुळे इंजिनिअरची नोकरी जाणार की भूमिका बदलणार? तज्ज्ञांनी सांगितला भविष्यातील मार्ग
2

AI मुळे इंजिनिअरची नोकरी जाणार की भूमिका बदलणार? तज्ज्ञांनी सांगितला भविष्यातील मार्ग

Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर
3

Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर

High paying jobs: कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ ५ नोकऱ्यांमध्ये मिळतो कोटींचा पगार……
4

High paying jobs: कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ ५ नोकऱ्यांमध्ये मिळतो कोटींचा पगार……

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.