
Image
या भरती मोहिमेत एकूण ५ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये नियंत्रक अतिक्रमण अधिकारी, सह. नियंत्रक अतिक्रमण, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहाय्यक लेखा अधिकारी आणि लघु टंकलेखक (मराठी व इंग्रजी) या पदांचा समावेश आहे. या सर्व पदांसाठी सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले असून, ऑक्टोबर २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणारे कर्मचारी देखील या पदांसाठी अर्ज करू शकतील. उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ६२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
Highest Paying Jobs: प्रायव्हेट की सरकारी? कोणत्या नोकरीत मिळतो सर्वात जास्त पगार आणि सोयी-सुविधा?
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज करताना लिफाफ्यावर “करार पद्धतीने मानधन तत्त्वावर विवक्षित कामांसाठी अर्ज” असे नमूद करून डाव्या बाजूला ठळक अक्षरांमध्ये पदाचे नाव लिहिणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ नोव्हेंबर २०२६ ही आहे. उमेदवार आपले अर्ज mmrismc@gmail.com या अधिकृत ईमेलवर किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती, डिस्मा बिल्डिंग, ऑफिस नं. ६३०, स्टील मार्केट, मुख्य रस्ता, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड, नवी मुंबई – ४१०२१८ या पत्त्यावर पाठवू शकतात. भरती प्रक्रियेबाबतचे नियम आणि अटी बाजार समितीच्या निर्देशानुसार लागू राहतील.
Ans: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ नोव्हेंबर २०२६ ही आहे.
Ans: या भरती मोहिमेत एकूण ५ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
Ans: उमेदवार आपले अर्ज mmrismc@gmail.com या ईमेलवर किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी, कळंबोली, नवी मुंबई येथील पत्त्यावर पाठवू शकतात.