
Image
या भरती प्रक्रियेत सिनिअर रिसर्च फेलो (SRF) च्या एका पदासाठी मृद व जलसंधारण अभियांत्रिकी, जलसंसाधन किंवा सिंचन अभियांत्रिकी विषयातील एम.टेक किंवा एम.ई. पदवीधारक उमेदवार पात्र असतील. या पदासाठी दरमहा ३७,००० रुपये अधिक १० टक्के घरभाडे भत्ता (HRA) दिले जाईल. तसेच तांत्रिक सहाय्यक पदासाठी बी.एससी. ॲग्री किंवा बी.ई./बी.टेक (कृषी अभियांत्रिकी) आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक असून यासाठी दरमहा १६,००० रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा पुरुषांसाठी ४० वर्षे आणि महिलांसाठी ४५ वर्षे ठेवण्यात आली आहे.
UPSC 2027 चे कॅलेंडर जाहीर! IAS/IPS होण्यासाठी किती महिन्यांचे करेंट अफेयर्स वाचावे? जाणून घ्या
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहीत नमुन्यात सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत टपाल, कूरियर किंवा प्रत्यक्ष विद्यापीठाच्या कार्यालयात सादर करायचे आहेत. याव्यतिरिक्त उमेदवार csws.mpkv@gmail.com या ईमेल आयडीवरही अर्ज पाठवू शकतात. अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी ईमेल किंवा संदेशाद्वारे कळवले जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी विद्यापीठाच्या www.mpkv.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रकल्प प्रमुखांकडून करण्यात आले आहे.