Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game… Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?

गूगलने Unity च्या सहकार्याने प्लेग्राऊंड नावाचे एक नवीन प्लॅटफॉर्म सादर केले आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये यूजर्स कोणत्याही कोडिंगचा वापर न करता व्हिडीओ गेम बनवू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 12, 2026 | 07:00 AM
काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game... Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?

काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game... Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?

Follow Us
Follow Us:
  • कोडिंगशिवाय तयार करू शकता व्हिडीओ गेम
  • टेक्स्ट प्रॉम्प्टद्वारे गेम बनवण्याची सुविधा
  • प्लेग्राऊंडमध्ये युनिटी स्पार्क देखील जोडला जाणार
गूगल गेमिंगच्या जगात देखील एआयला एका नव्या उंचीवर नेण्याची तयारी करत आहे. आता गेम बनवण्यासाठी कोडिंग किंवा दिर्घकाळ डेव्हलपमेंट करण्याची गरज कमी होऊ शकते. कंपनीने Unity च्या सहकार्याने प्लेग्राऊंड नावाचे एक नवीन प्लॅटफॉर्म सादर केले आहे. इथे यूजर्स केवळ टेक्स्ट प्रॉम्प्टचा वापर करून व्हिडीओ गेम तयार करू शकणार आहेत. या तंत्रज्ञानाचा उद्देश असा आहे की, गेम क्रिएशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे. सध्या या तंत्रज्ञानाचा वापर 18 वर्षे आणि त्यावरील वयाचे यूजर्स करू शकणार आहेत.

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स

टेक्स्ट प्रॉम्प्टचा वापर करून तयार होणार व्हिडीओ गेम

गूगलचे प्लेग्राऊंड यूजर्सना नैसर्गिक भाषेत देण्यात आलेल्या टेक्स्ट प्रॉम्प्टद्वारे गेम बनवण्याची आणि त्यामध्ये बदल करण्याची सुविधा देते. विशेष म्हणजेच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी यूजर्सना कोडिंगबद्दल माहिती असणं गरजेचं नाही. या तंत्रज्ञानमध्ये गेमची कल्पना सांगण्यासाठी प्रॉम्प्ट लिहीणं गरजेचं आहे आणि प्लॅटफॉर्म याच प्रॉम्प्टच्या आधारे गेम तयार करणार आहे. प्लेग्राऊंडमध्ये गूगलच्या एआय मॉडेल्ससह दुसऱ्या ॲडव्हांस एआय टेक्नोलॉजी आणि कंपनीच्या सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. तयार करण्यात आलेला गेम गूगल प्लेग्राऊंडवर पब्लिश देखील केला जाऊ शकतो. या ठिकाणी दुसरे यूजर्स हा गेम डाऊनलोड करू शकतात आणि खेळू शकतात.  (फोटो सौजन्य – AI Created)

प्लेग्राऊंडमध्ये जोडला जाणार युनिटी स्पार्क

प्लेग्राऊंडमध्ये युनिटी स्पार्क देखील जोडला जाणार आहे. याला 2026 च्या अखेरीस प्लॅटफॉर्मसोबत इंटीग्रेट करण्याची तयारी सुरु झाली आहे. Unity नुसार, हे जास्त ॲडव्हांस गेम मेकॅनिक्स आणि हाय-क्वालिटी 3D एक्सपीरियंस तयार करण्यासाठी मदत करणार आहे. युनिटी स्पार्कमध्ये काही असेट्स AI चा वापर करून तयार केले जातील, तर बहुतांश प्रतिमा आणि इफेक्ट्स युनिटीच्या विद्यमान लायब्ररीमधून घेतले जातील. कंपनीने असे म्हटले आहे की, ज्या मानवी कलाकारांनी ही मालमत्ता तयार केली आहे, त्यांना श्रेय आणि मोबदला दिला जाईल. प्लेग्राउंड आणि स्पार्क या दोन्हींमध्ये वापराच्या आधारावर मोफत आणि सशुल्क असे दोन पर्याय उपलब्ध असतील.

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स

‘प्लेग्राउंड’ हा गुगलच्या ‘वर्ल्ड मॉडेल्स’ तंत्रज्ञानावर कंपनीने वाढवलेल्या फोकसचा एक भाग आहे. हे एआय टेक्स्ट प्रॉम्प्टच्या आधारे वर्चुअल जग तयार करू शकते आणि ती केवळ भाषा समजण्यापुरती मर्यादित नाही. गुगलने गेल्या वर्षी आपले जागतिक मॉडेल, जिनी 3, लाँच केले होते. जानेवारीमध्ये, कंपनीने जिनीचा वापर करून आभासी जग आणि पात्रे तयार करण्यास सक्षम असलेल्या एका प्रोटोटाइपचे अनावरणही केले होते.

Web Title: Google introduced new technology to create video games using text prompts without coding hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स
1

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स

JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी… यूजर्सना मिळणार खास फायदे
2

JIO Plans: 28 दिवसांच्या रिचार्जची कटकट संपली! हे 2 प्लॅन्स देतात संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी… यूजर्सना मिळणार खास फायदे

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स
3

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी
4

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.