
Image
महाव्यवस्थापक या पदासाठी एकूण १ जागा उपलब्ध असून ग्रॅजुएट पोस्ट ग्रॅज्युएट किंवा एमबीए फायनान्स पदवी असणे आवश्यक आहे. तसेच JAIIB / CAIIB / DBF / GDC&A उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याशिवाय सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी महाव्यवस्थापक उपमहाव्यवस्थापक किंवा सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून किमान ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. कर्ज, वसूली, गुंतवणूक आणि लेखापरीक्षण विभागामध्ये किमान ७ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक परिपत्रकांच्या अंमलबजावणीचा अनुभव आणि संगणक ज्ञान असणे अनिवार्य आहे.
तर शाखाधिकारी या पदासाठी ३ जागा उपलब्ध असून बी.कॉम, एमकॉम, बीए, एमए, एमएससी किंवा एमबीए फायनान्स पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असून JAIIB / GDC&A असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच सहकारी बँकेत शाखाधिकारी किंवा अधिकारी म्हणून किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच बँक क्रेडिट, अप्रेजल व मॉनटरींग, बिजनेस डेव्हलपमेंट, ऑडिट व कर्ज वसुलीबाबत अनुभव असणे गरजेचे आहे.
नेमणुकीबाबतचा अंतिम निर्णय संचालक मंडळाकडे राहील. इच्छुक व अनुभवी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज बायोडाटा तसेच शैक्षणिक व अनुभव कागदपत्रे आणि त्याच्या सत्यप्रतीसह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत स्पीड पोस्टद्वारे किंवा hokundal@mpscbank.com या ईमेलद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, मामासाहेब पवार सत्यविजय को-ऑप बँक लि., कुंडल, मुख्य कार्यालय, मेन रोड, कुंडल, ता. पलूस, जि. सांगली – ४१६३०१ या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी बँकेच्या www.mpscbank.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
Top 6 Skills for Success: फक्त पदवी पुरेशी नाही! ‘या’ ६ महत्त्वाच्या कौशल्याने कमवा बक्कळ पैसा
Ans: या भरतीद्वारे 'महाव्यवस्थापक' (१ जागा) आणि 'शाखाधिकारी' (३ जागा) ही पदे भरली जाणार आहेत.
Ans: इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बायोडाटा व कागदपत्रांसह स्पीड पोस्टद्वारे किंवा hokundal@mpscbank.com या ईमेलवर मुख्य कार्यालय, कुंडल, जि. सांगली येथे पाठवणे आवश्यक आहे.
Ans: बँकेची अधिकृत वेबसाइट www.mpscbank.in ही आहे.