Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top 6 Skills for Success: फक्त पदवी पुरेशी नाही! ‘या’ ६ महत्त्वाच्या कौशल्याने कमवा बक्कळ पैसा

Top 6 Skills for Success: शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवणे, स्वतःचा व्यवसाय सुरू करणे असो किंवा नोकरीमध्ये वेगाने पुढे जायचे असो, प्रत्येक ठिकाणी काही अशा स्किल्स कामी येतात, जे तुम्हाला इतरांपासून वेगळे ठरवतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 27, 2026 | 02:32 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • पदवीशिवाय करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे?
  • AI Skills शिकणे का गरजेचे आहे?
  • फायनान्शियल नॉलेज का महत्त्वाचे आहे?
Top 6 Skills for Success: आजच्या काळात केवळ पदवी मिळवणे ही यशाची हमी नाही. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवणे, स्वतःचा व्यवसाय सुरू करणे असो किंवा नोकरीमध्ये वेगाने पुढे जायचे असो, प्रत्येक ठिकाणी काही अशा स्किल्स कामी येतात, जे तुम्हाला इतरांपासून वेगळे ठरवतात. बऱ्याचदा लोकांकडे चांगली पदवी आणि माहिती असते, परंतु ते आपले म्हणणे योग्य प्रकारे मांडू शकत नाहीत, पैशांचे गणित समजत नाहीत किंवा नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊ शकत नाहीत. अशा वेळी काही आवश्यक स्किल्स शिकून तुम्ही तुमचे करिअर आणि वैयक्तिक आयुष्य दोन्ही सुधारू शकता. अशा कोणत्या ६ स्किल्स आहेत, ज्यांचा फायदा तुम्हाला जवळपास प्रत्येक क्षेत्रात होऊ शकतो, ते पाहूया.

१. कम्युनिकेशन स्किल्स

तुमच्याकडे कितीही चांगली माहिती असली, तरी ती जर तुम्ही इतरांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवू शकला नाहीत, तर अनेक संधी हातातून निघून जाऊ शकतात. कम्युनिकेशन स्किल्सचा अर्थ केवळ चांगले बोलणे असा होत नाही, तर समोरच्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे, आपले म्हणणे सोप्या शब्दांत समजावून सांगणे आणि योग्य वेळी योग्य प्रकारे उत्तर देणे हेसुद्धा आहे. नोकरीच्या मुलाखतीपासून ते ऑफिसच्या मीटिंग आणि बिझनेस डीलपर्यंत, प्रत्येक ठिकाणी याची गरज भासते.

जर तुम्हाला ही स्किल सुधारित करायची असेल, तर दररोज कोणत्याही विषयावर २-३ मिनिटे बोलण्याचा सराव करा. इतरांचे बोलणे मध्येच तोडणे टाळा आणि आपले म्हणणे कमी शब्दांत स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. चांगल्या कम्युनिकेशन स्किल्समुळे लोकांसोबतचे तुमचे संबंध सुधारतात आणि कामादरम्यान गैरसमजही कमी होतात.

२. फायनान्शियल नॉलेज

पैसा कमावणे महत्त्वाचे आहे, पण तो योग्य पद्धतीने हाताळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. बऱ्याच लोकांना चांगल्या कमाईनंतरही महिन्याच्या शेवटी पैसे वाचवता येत नाहीत. याचे एक मोठे कारण पैशांचे योग्य नियोजन न करणे असू शकते. फायनान्शियल नॉलेज म्हणजेच पैशांची समज तुम्हाला तुमची कमाई, खर्च, बचत आणि गुंतवणूक यांच्यात योग्य समतोल साधायला शिकवते.

ही स्किल शिकण्यासाठी सर्वप्रथम महिन्याची कमाई आणि खर्चाचा हिशोब ठेवण्यास सुरुवात करा. गरज आणि मौजमजा यातील फरक समजून घ्या, आणीबाणीच्या प्रसंगासाठी पैसे वाचवा आणि बँक खाते, व्याज, महागाई, इन्शुरन्स आणि गुंतवणुकीचे मूळ नियम जाणून घ्या. कोणत्याही गुंतवणुकीत पैसे गुंतवण्यापूर्वी त्याचे धोके समजून घेणे आवश्यक आहे. पैशांची चांगली समज तुम्हाला आर्थिक निर्णय घेण्यास मदत करते आणि भविष्यासाठी उत्तम तयारी करण्याची संधी देते.

३. इंग्लिश स्पीकिंग

इंग्रजी बोलणे प्रत्येक नोकरीत किंवा प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असतेच असे नाही, परंतु अनेक ठिकाणी हे एक उपयुक्त कौशल्य ठरते. विशेषतः कॉर्पोरेट ऑफिस, बहुराष्ट्रीय कंपन्या (MNCs), मुलाखती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना इंग्रजीत संवाद साधण्याची क्षमता नवीन संधींपर्यंत पोहोचणे सोपे करू शकते. याचा अर्थ असा नाही की इंग्रजी येत नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या भाषेत उत्तम पकड आणि विषयाची समज देखील तितकीच महत्त्वाची आहे.

जर तुम्हाला इंग्रजी बोलताना संकोच वाटत असेल, तर लहान वाक्यांपासून सुरुवात करा. दररोज १०-१५ मिनिटे इंग्रजीत बोलण्याचा सराव करा. सोपे व्हिडिओ पहा, नवीन शब्द शिका आणि त्या शब्दांचा वापर करून वाक्य बनवा. चुका झाल्यावर घाईगडबड करण्याऐवजी त्यातून शिका. हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि संभाषणात तुम्ही अधिक सहज महसूल कराल.

४. सेल्फ डिसिप्लिन

यश मिळवण्यासाठी केवळ ध्येय निश्चित करणे पुरेसे नसते. ते ध्येय साध्य करण्यासाठी दररोज सातत्याने काम करणे देखील गरजेचे आहे. सेल्फ डिसिप्लिन म्हणजेच आत्म-अनुशासन तुम्हाला तुमचा वेळ, सवयी आणि कामावर नियंत्रण ठेवायला शिकवतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादी नवीन स्किल शिकायची असेल, तर एकाच दिवशी अनेक तास वाचण्याऐवजी दररोज थोडा वेळ देणे अधिक उपयुक्त ठरू शकते.

ही स्किल विकसित करण्यासाठी दिवसाच्या सुरुवातीला आवश्यक कामांची यादी बनवा आणि सर्वात महत्त्वाचे काम आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मोबाईलवर विनाकारण वेळ घालवणे टाळा आणि मोठ्या ध्येयाचे लहान-लहान भागांत विभाजन करा. दररोज आपल्या कामाचा आढावा घ्या. जेव्हा तुम्ही नियमितपणे ठरलेली कामे पूर्ण करू लागता, तेव्हा हळूहळू तुमची काम करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास दोन्ही सुधारू शकतात.

५. मार्केटिंग स्किल्स

मार्केटिंगचा अर्थ केवळ एखादे उत्पादन विकणे असा नाही. याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे लोकांना कशाची गरज आहे आणि तुमचे काम त्यांची गरज कशी पूर्ण करू शकते हे समजून घेणे. ही स्किल नोकरी करणाऱ्यांसाठी, व्यावसायिकांसाठी, फ्रीलांसरसाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे. जर तुमच्याकडे उत्तम कौशल्य असेल, पण लोकांकडे त्याची माहितीच नसेल, तर तुम्हाला योग्य संधी मिळण्यात अडचण येऊ शकते.

Highest Paying Jobs: प्रायव्हेट की सरकारी? कोणत्या नोकरीत मिळतो सर्वात जास्त पगार आणि सोयी-सुविधा?

मार्केटिंग शिकण्यासाठी सर्वप्रथम आपल्या कामाची किंवा उत्पादनाची खासियत समजून घ्या. त्यानंतर ते उत्पादन कोणत्या लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या समस्येचे निराकरण हवे आहे हे जाणून घ्या. डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, कंटेंट मार्केटिंग आणि ग्राहकांशी संवाद यांसारख्या गोष्टींची मूलभूत माहिती मिळवा. तसेच, लोकांची गरज समजून घेणे आणि त्यांचा विश्वास टिकवून ठेवणे देखील शिका. चांगल्या मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमचे काम योग्य लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

६. एआय स्किल्स

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आता शिक्षण, ऑफिसचे काम, मार्केटिंग, संशोधन आणि कंटेंन्ट निर्मिती यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये वापरला जात आहे. अशा परिस्थितीत AI टूल्सचा योग्य वापर कसा करावा हे शिकणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. यांच्या मदतीने माहिती गोळा करणे, नवीन कल्पना शोधणे, डेटा समजून घेणे आणि दैनंदिन कामे जलद गतीने पूर्ण करण्यास मदत मिळू शकते.

MMRISMC Recruitment 2026: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कंत्राटी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

AI स्किल शिकण्यासाठी सोप्या टूल्सपासून सुरुवात करा. प्रश्न विचारण्यासाठी, एखादा विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी, ई-मेलचा मसुदा तयार करण्यासाठी किंवा एखाद्या कामाचे नियोजन करण्यासाठी याचा वापर करा. तसेच, AI ला स्पष्ट सूचना कशा द्यायच्या आणि त्याच्या उत्तरांची पडताळणी कशी करायची हे देखील शिका. AI कडून मिळालेली प्रत्येक माहिती अचूक असेलच असे नाही. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विश्वासार्ह स्त्रोतांकडून तथ्यांची खात्री करून घ्या. AI ला आपल्या बुद्धिमत्तेचा आणि मेहनतीचा पर्याय न मानता, कामात मदत करणारे साधन म्हणून वापरावे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पदवीशिवाय करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे?

    Ans: पदवीसोबतच कम्युनिकेशन स्किल्स, फायनान्शियल नॉलेज, डिजिटल/AI स्किल्स आणि सेल्फ डिसिप्लिन यांसारखी व्यावहारिक कौशल्ये असणे अत्यंत आवश्यक आहे.

  • Que: AI Skills शिकणे का गरजेचे आहे?

    Ans: AI टूल्सच्या मदतीने डेटा समजून घेणे, संशोधन करणे आणि दैनंदिन कामे वेगाने पूर्ण करणे सोपे होते, ज्यामुळे कामातील उत्पादकता वाढते.

  • Que: फायनान्शियल नॉलेज का महत्त्वाचे आहे?

    Ans: फायनान्शियल नॉलेजमुळे कमाई, खर्च, बचत आणि योग्य गुंतवणुकीमध्ये समतोल साधून आर्थिक निर्णय घेणे सोपे होते.

Web Title: Top 6 skills for success career in marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Job
  • Marathi News
  • Skill Development

संबंधित बातम्या

Bhimashankar forest tree: भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! 34 हजार नव्हे, 90 हजार झाडांची कत्तल होणार?
1

Bhimashankar forest tree: भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! 34 हजार नव्हे, 90 हजार झाडांची कत्तल होणार?

Vastu Tips OF Wall Colour: दिवाळीपूर्वी घर रंगवताना चूक करू नका! वास्तुशास्त्रानुसार ‘हे’ रंग आणतील सुख-समृद्धी?
2

Vastu Tips OF Wall Colour: दिवाळीपूर्वी घर रंगवताना चूक करू नका! वास्तुशास्त्रानुसार ‘हे’ रंग आणतील सुख-समृद्धी?

Sambhajinagar News: जरांगेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपचे फॉरेन्सिक ऑडिट होणार; शिवेंद्रराजे भोसले
3

Sambhajinagar News: जरांगेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपचे फॉरेन्सिक ऑडिट होणार; शिवेंद्रराजे भोसले

Viral Video: आईसाठी मुलाची भन्नाट टेक्नॉलॉजी! मिनी रोबोटने दिलं बर्थडे गिफ्ट, VIDEO पाहून चेहऱ्यावर येईल हसू
4

Viral Video: आईसाठी मुलाची भन्नाट टेक्नॉलॉजी! मिनी रोबोटने दिलं बर्थडे गिफ्ट, VIDEO पाहून चेहऱ्यावर येईल हसू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.