Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports Club Recruitment 2026: खेळाडूंसाठी मोठी बातमी! मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ५४ जागांवर भरती; लगेच करा अर्ज

Mumbai Port Trust Sports Club Recruitment 2026: मुंबई पोर्ट अथॉरिटी स्पोर्ट्स क्लबने ५४ क्रीडा प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑफलाइन अर्ज करा आणि दरमहा २०,००० स्टायपेंड मिळवा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 26, 2026 | 11:34 AM
sport

sport

Follow Us
Follow Us:

Mumbai Port Trust Sports Club Recruitment 2026: मुंबईत क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि सरकारी किंवा निमशासकीय संस्थेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या होतकरू तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या स्पोर्ट्स क्लबतर्फे कंत्राटी तत्त्वावर ‘क्रीडा प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ५४ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमुळे विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना मुंबई पोर्ट अथॉरिटीसोबत काम करण्याची आणि आपल्या क्रीडा कौशल्याला अधिक विकसित करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

या विशेष भरती मोहिमेत एकूण ५४ जागांसाठी खेळाडूंची निवड केली जाणार असून, यामध्ये विविध ९ खेळांचा समावेश आहे. यामध्ये पुरुषांची भरती केली जाणार आहे. पदानुसार रिक्त जागांचा तपशील पाहिल्यास, ॲथलेटिक्ससाठी २, शटल बॅडमिंटनसाठी २, क्रिकेटसाठी १०, कॅरमसाठी १, फुटबॉलसाठी ११, हॉकीसाठी १२, कबड्डीसाठी १०, व्हॉलीबॉलसाठी ५ आणि टेबल टेनिससाठी १ जागेवर भरती होणार आहे. खेळाडूंच्या क्रीडा प्रकारानुसार या जागांचे योग्य वाटप करण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रिया

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. या अर्जासाठी २०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांनी विहित मुदतीत आपले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर पाठवणे बंधनकारक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज पाठवण्याचा पत्ता खालीलप्रमाणे नोंदवावा: मुंबई पोर्ट ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लबचे कार्यालय, तिसरा मजला, इम्पीरियल चेंबर्स, एस. एस. तालोनी मार्ग, न्यू कस्टम हाऊससमोर, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१ असा हा पत्ता आहे. अर्जासोबत आवश्यक क्रीडा प्रमाणपत्रे आणि डिमांड ड्राफ्ट जोडणे अनिवार्य आहे, जेणेकरून अर्ज रद्द होणार नाही.

Mumbai Port Trust Recruitment: मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; ९ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

नियुक्त उमेदवारांना मिळणार ‘या’ सुविधा

या भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा १ सप्टेंबर २०२६ रोजी किमान १८ वर्षे आणि ३० जून २०२७ रोजी कमाल २५ वर्षे अशी निश्चित करण्यात आली असून यात कोणतीही सवलत मिळणार नाही. तसेच उमेदवारांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य किंवा आंतर-विद्यापीठ स्तरावर संबंधित खेळात प्रतिनिधित्व केलेले असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना दरमहा २०,००० रुपयांचे विद्यावेतन, १०,००० रुपयांचे किट आणि गियर, मोफत निवास व्यवस्था आणि मेडिक्लेमसह अपघात विमा असा आकर्षक लाभ मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Vidya Saathi App : विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘विद्या साथी ॲप’ लाँच; २४ तास लाईव्ह टीचर आणि AI टूल्सची मिळणार मदत!

Web Title: Mumbai port trust sports club recruitment 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Government Job
  • Maharashtra Sports

संबंधित बातम्या

CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल
1

CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल

Agniveer Retirement Updates: अग्निवीरांसाठी खूशखबर! चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!
2

Agniveer Retirement Updates: अग्निवीरांसाठी खूशखबर! चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!

Handball Tournament: अजित-ओमची भरारी! गुरुकुलच्या दोन शिलेदारांची थेट महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड
3

Handball Tournament: अजित-ओमची भरारी! गुरुकुलच्या दोन शिलेदारांची थेट महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
4

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.