Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 24 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Agniveer Retirement Updates: अग्निवीरांसाठी खूशखबर! चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!

Agniveer Retirement Updates: भारतीय नौदलातील अग्निवीरांचा पहिला बँच लवकरच ४ वर्षांची सेवा पूर्ण करून बाहेर येणार आहे. सरकारतर्फे अग्निवीरांच्या पुनर्वसनासाठी काय तयारी करण्यात आली आहे आणि त्यांना कोणते आर्थिक लाभ मिळतील, याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 10, 2026 | 11:00 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Agniveer Retirement Updates: अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात दाखल झालेल्या तरुणांच्या प्रवासाला एक नवीन वळण मिळाले आहे. चार वर्षांपूर्वी या योजनेची घोषणा झाली तेव्हा देशभरात यावर मोठी चर्चा आणि वादविवाद झाला होता. भारतीय नौदलातील अग्निवीरांचा पहिला बँच २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आपली ४ वर्षांची सेवा पूर्ण करून बाहेर येणार आहे. या ऐतिहासिक क्षणासोबतच सैन्यातून परतणाऱ्या या तरुणांच्या भविष्याचे काय होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

४ वर्षांनंतर साधारण ७५ टक्के अग्निवीर सेवामुक्त होणार आहेत, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २५ टक्के तरुणांना सैन्यात कायम केले जाईल. तिन्ही सैन्यदल रिटेंशन रेट (सेवाकाळ वाढवण्याबाबत) वाढवण्याचा विचार करत असून, या संदर्भात सरकारला नवीन प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू आहे. ४ वर्षांची सेवा पूर्ण करून नागरी जीवनात परतणाऱ्या तरुणांच्या मनात भविष्याबाबत अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या पुनर्वास आणि भविष्याला सुरक्षित करण्यासाठी सरकारने काय ठोस तयारी केली आहे, ते पाहूया:

सेवा पूर्ण झाल्यावर अग्निवीरांना मिळणाऱ्या सुविधा

चार वर्षांची सेवा संपल्यानंतर जेव्हा अग्निवीर बाहेर पडतील, तेव्हा त्यांना सरकारतर्फे विविध आर्थिक लाभ दिले जातील:

सेवा निधी पॅकेज: निवृत्त होत असलेल्या प्रत्येक अग्निवीराला एकत्रितपणे सुमारे १०.०४ लाख रुपयांचे सेवा निधी पॅकेज मिळेल. ही रक्कम करमुक्त असेल. यात तरुणाचे स्वतःचे योगदान, सरकारचा समान हिस्सा आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजाचा समावेश असतो.

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित

जीवन विमा संरक्षण: सेवाकाळात अग्निवीरांना ४८ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते, जे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक मोठे सुरक्षा कवच ठरते.

कौशल्य प्रमाणपत्र : निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना कौशल्य प्रमाणपत्र दिले जाईल. यामुळे त्यांना पुढे खाजगी किंवा सरकारी नोकरीत मुलाखतीदरम्यान प्राधान्य मिळण्यास मदत होईल. मात्र, त्यांना ग्रॅच्युटी, पेन्शन किंवा वैद्यकीय आणि कॅन्टीनची आजीवन सुविधा मिळणार नाही.

तरुणांच्या भविष्यासाठी आणि रोजगारासाठी केलेले उपाय

चार देशसेवेची वर्षे पूर्ण करणारे हे तरुण बेरोजगार राहणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी सरकार आणि विविध मंत्रालये प्रयत्न करत असून काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत:

गृह मंत्रालयाचे नवीन पोर्टल: माजी अग्निवीरांना कॉर्पोरेट आणि सरकारी क्षेत्रात सहज सामावून घेण्यासाठी गृह मंत्रालयाकडून एक विशेष पोर्टल तयार केले जात आहे. याद्वारे त्यांना नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध होतील.

निमलष्करी दलांमध्ये (CAPF) ५० टक्के आरक्षण: बीएसएफ (BSF), सीआरपीएफ (CRPF), सीआयएसएफ (CISF), आयटीबीपी (ITBP) आणि आसाम रायफल्स यांसारख्या सुरक्षा दलांमधील कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) आणि रायफलमन पदांसाठी माजी अग्निवीरांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी ‘पूर्व-अग्निवीर’ नावाची नवीन श्रेणी देखील तयार करण्यात आली आहे.

शारीरिक आणि लिखित परीक्षेत सूट: या सुरक्षा दलांमध्ये भरतीदरम्यान माजी अग्निवीरांना शारीरिक मानक चाचणी (PST), शारीरिक दक्षता चाचणी (PET) आणि लिखित परीक्षेतून सूट दिली जाईल.

पुण्यातील MPSC Protest ला प्रशासनाचा दणका; विद्यार्थ्यांना १२ तासांत जागा खाली करण्याचे कठोर निर्देश!

राज्य सरकारांचे कोटे आणि वयात सूट: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्य सरकारांनी पोलीस आणि इतर विभागांमध्ये माजी अग्निवीरांसाठी १० ते २० टक्के पदे राखीव ठेवली आहेत. तसेच, वयोमर्यादेत ३ ते ५ वर्षांपर्यंतची सूट देण्याची घोषणाही करण्यात आली आहे, ज्यामुळे या तरुणांना सहज सरकारी नोकरी मिळवता येईल.

Web Title: Agniveer retirement agnipath first batch scheme benefits 2026 sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Agniveer Scheme
  • Government Job
  • Retired Employee

संबंधित बातम्या

ASRB Recruitment 2026: कृषी क्षेत्रात करिअर करायचयं? १,३९३ पदांवर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
1

ASRB Recruitment 2026: कृषी क्षेत्रात करिअर करायचयं? १,३९३ पदांवर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

SSC Recruitment 2026: SSC मध्ये ‘या’ पदांवर विभागीय भरती; कशी असेल निवड प्रक्रिया आणि अर्जाची मुदत?
2

SSC Recruitment 2026: SSC मध्ये ‘या’ पदांवर विभागीय भरती; कशी असेल निवड प्रक्रिया आणि अर्जाची मुदत?

Agnipath Scheme New Rules: अग्निवीरांसाठी मोठी खुशखबर! सेवाकाळ ४ वरून ६ वर्षे झाला; पगारमध्येही झाली बंपर वाढ
3

Agnipath Scheme New Rules: अग्निवीरांसाठी मोठी खुशखबर! सेवाकाळ ४ वरून ६ वर्षे झाला; पगारमध्येही झाली बंपर वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.