Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठात ‘RT-PCR’ आणि प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षणाला सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची मोठी संधी

मुंबई विद्यापीठाने १८ मे पासून RT-PCR आणि प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजीवर २ आठवड्यांचे ऑन-जॉब ट्रेनिंग सुरू केले आहे. विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी हा ४ क्रेडिटचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 11, 2026 | 09:34 PM
मुंबई विद्यापीठात ‘RT-PCR’ आणि प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षणाला सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची मोठी संधी
Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुंबई विद्यापीठात ‘RT-PCR’ आणि प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षणाला सुरुवात
  • विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची मोठी संधी
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क/नीता परब: जैवतंत्रज्ञान आणि आरोग्य संशोधन क्षेत्रात वाढत्या तांत्रिक कौशल्यांच्या गरजा लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राने आरटी-पीसीआर व प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजी तंत्रज्ञानावरील दोन आठवड्यांचा ऑन-जॉब ट्रेनिंग (ओजेटी) कार्यक्रम सुरू केला आहे. जीव विज्ञान शाखेतील विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसिद्धता वाढविण्याच्या उद्देशाने हा ४ क्रेडिटचा अल्पकालीन प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आरटी-पीसीआर, मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स, फ्लुरोसन्स इमेजिंग, ऑटोमेटेड लॅबोरेटरी सिस्टिम्स यांसारख्या अत्याधुनिक प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. संशोधन संस्था, रुग्णालये, निदान प्रयोगशाळा आणि जैवतंत्रज्ञान कंपन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाची ओळख या माध्यमातून होणार आहे.

जैवतंत्रज्ञान उद्योग, फार्मास्युटिकल कंपन्या, क्लिनिकल रिसर्च संस्था, सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि शैक्षणिक संशोधन केंद्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा कौशल्ये, संशोधन क्षमता आणि आधुनिक तांत्रिक ज्ञान प्रदान करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठ LL.M. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येईल प्रवेश

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत अनुभवाधारित शिक्षण, बहुविषयक अध्ययन आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आधुनिक शिक्षण हे केवळ सैद्धांतिक मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग आणि उद्योगसापेक्ष कौशल्ये देणारे असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रम क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाची पहिली तुकडी १८ मे ते ३०  मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांकडून आणि संशोधकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्र, मुंबई विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे आवाहन या केंद्राचे संचालक प्रा. विश्वनाथ पाटील यांनी केले आहे.

Internship in Japan: जपानला जाऊन काम करायचंय? मग जपानच्या ‘या’ इंटर्नशिपबद्दल नक्की जाणून घ्या..

Web Title: Mumbai university nanoscience center rt pcr molecular biology on job training program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • Career News
  • Mumbai University

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबई विद्यापीठात मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षण! राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राचा उपक्रम
1

Mumbai News: मुंबई विद्यापीठात मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षण! राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राचा उपक्रम

मुंबई विद्यापीठ LL.M. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येईल प्रवेश
2

मुंबई विद्यापीठ LL.M. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येईल प्रवेश

मुंबई विद्यापीठ: एलएल.एम. सीईटी परीक्षेच्या पुनर्नियोजनाची बाब विचाराधीन! अंतिम निर्णय अद्याप नाही
3

मुंबई विद्यापीठ: एलएल.एम. सीईटी परीक्षेच्या पुनर्नियोजनाची बाब विचाराधीन! अंतिम निर्णय अद्याप नाही

Billabong Novel: ‘बिल्लाबाँग’ कादंबरीतून अर्धनागरी जीवनाचे वास्तव आणि बंडखोर अन्वयार्थ; मुंबईत दिमाखात पार पडला प्रकाशन सोहळ
4

Billabong Novel: ‘बिल्लाबाँग’ कादंबरीतून अर्धनागरी जीवनाचे वास्तव आणि बंडखोर अन्वयार्थ; मुंबईत दिमाखात पार पडला प्रकाशन सोहळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.