Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Scholarship Examination 2026: 31 हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा; पण ‘हॉट संडे’मुळे विद्यार्थी आणि पालकांचे हाल!

नागपूर जिल्ह्यात इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा ३१,४२७ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडली. वाढत्या उन्हामुळे पालकांनी परीक्षेच्या वेळेवर नाराजी व्यक्त केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 27, 2026 | 05:06 PM
31 हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा (Photo Credit- X)

31 हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • 31 हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
  •  पण ‘हॉट संडे’मुळे विद्यार्थी आणि पालकांचे हाल!
Nagpur Scholarship Examination 2026: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने प्राथमिक (इयत्ता चौथी) व उच्च प्राथमिक (इयत्ता सातवी) शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, २६ एप्रिलला जिल्ह्यातील २२८ केंद्रांवर शांततेत पार पडली. परीक्षेसाठी एकूण ३१,४२७ विद्यार्थी उपस्थित राहिले, तर २,४४३ विद्यार्थी विविध कारणांमुळे गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे. भर उन्हाळ्यात परीक्षा आयोजित केल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले. यंदाच्या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी काही वर्षे ही परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेतली जात होती. तसेच २२ फेब्रुवारीला पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीही परीक्षा पार पडली होती. मात्र, चालू वर्षात बदल करून चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली आहे. दरम्यान, शिक्षणाधिकारी (प्राथ.) नीलेश गुंड यांनी सेंट ऊर्सुला गर्ल्स हायस्कूल व प्रॉव्हिडन्स गर्ल्स हायस्कूल येथील परीक्षा केंद्राला भेटी दिल्या, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर झोडे यांनी सोमलवार प्रायमरी स्कूल, कन्या हायस्कूल सीताबर्डी व सुळे हायस्कूल धंतोली येथे भेटी दिल्या. उपशिक्षणाधिकारी रमेश हरडे यांनी शहरातील काही केंद्रांवर भेटी दिल्या.

उन्हाळ्यात परीक्षा नकोच

इयत्ता चौथीसाठी १९,९६० विद्यार्थी तर इयत्ता सातवीसाठी १२,६२६ विद्यार्थी बसले होते. परीक्षेसाठी जिल्ह्यातील २२८ केंद्रांपैकी चौथीसाठी १२९ तर सातवीसाठी ९९ केंद्रे निश्चित केली होती. परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत घेतली. मात्र, या वेळेमुळे भर उन्हात पालकांना केंद्राबाहेर थांबावे लागले. अनेक ठिकाणी सावली, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था यांचा अभाव असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. काही पालकांनी सांगितले की, उन्हाच्या तीव्रतेत लहान मुलांना परीक्षा देणे कठीण जाते. त्यातच परीक्षा केंद्रांवर मूलभूत सुविधा नसल्याने अडचणी
वाढतात. पुढील वर्षांपासून अशा परीक्षा सकाळी लवकर किंवा थंड वातावरणात घ्याव्या, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.

SSC Recruitment 2026: सरकारी नोकरीची संधी! हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी भरती सुरू; कोण करू शकतो अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. खालील तक्त्यात इयत्ता चौथी आणि सातवीच्या उपस्थित विद्यार्थ्यांची आकडेवारी दिली आहे:

तालुका इयत्ता चौथी (हजर विद्यार्थी) इयत्ता सातवी (हजर विद्यार्थी)
नागपूर (शहर) ५,७३२ ४,२१३
नागपूर (ग्रामीण) १,७३८ ९७४
हिंगणा १,३५२ ८२२
सावनेर १,१८४ ७३७
मौदा १,०८५ ६४०
कामठी १,०६१ ६०५
रामटेक १,०४८ ६०२
उमरेड १,०१५ ५६३
काटोल १,०१४ ६५५
कुही ८६८ ६०७
नरखेड ८२१ ६७२
पारशिवनी ७३५ ३४१
भिवापूर ६६७ ४११
कळमेश्वर ५२८ ७८४

परीक्षेची एकूण आकडेवारी:

  • एकूण उपस्थित विद्यार्थी: ३१,४२७
  • एकूण गैरहजर विद्यार्थी: २,४४३

 Success Story: 14 व्या वर्षी वडीलांचं छत्र हरपलं, शेतात राबली अन्… इल्मा अफरोज यांची IPS अधिकारी बनण्याची कहाणी

Web Title: Nagpur scholarship exam class 4 7 attendance and parents protest details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • Career News
  • Scholarship Exam

संबंधित बातम्या

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती
1

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
2

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.