Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur University : नवलच! परीक्षेला बसूनही गैरहजर, वर्ष धोक्यात; विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठमध्ये परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याला गैरहजर दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. निकालात लेखी परीक्षेत ‘गैरहजर’ दाखवल्याने संबंधित विद्यार्थी नापास ठरला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 08, 2026 | 03:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच्या गुणपत्रिकेत लेखी परीक्षेत ‘गैरहजर’ असा उल्लेख करण्यात आला
  • ठोस पुराव्यानिशी तो सध्या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे न्यायासाठी धाव घेत आहे
  • विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठच्या परीक्षा विभागातील निष्काळजीपणाचे धक्कादायक प्रकरण समोर आले असून, परीक्षेला प्रत्यक्ष बसलेल्या विद्यार्थ्याला गैरहजर दाखवून नापास करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. या चुकीमुळे संबंधित विद्यार्थ्याचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठात महामानवांच्या क्रांतिकारी विचारांचा जागर! भीमजयंतीनिमित्त विशेष उपक्रम

ही घटना प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी आदित्य याच्याशी संबंधित आहे. उन्हाळी सत्रात ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ विषयात अपयशी ठरल्यानंतर त्याने हिवाळी सत्रात पुन्हा परीक्षा दिली होती. त्याचे परीक्षा केंद्र राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय येथे होते. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच्या गुणपत्रिकेत लेखी परीक्षेत ‘गैरहजर’ असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे त्याला शून्य गुण देण्यात आले, तर प्रात्यक्षिक परीक्षेत त्याने १५ गुण मिळवले होते. आदित्यच्या म्हणण्यानुसार, तो संबंधित पेपरसाठी प्रत्यक्ष उपस्थित होता. आपली बाजू सिद्ध करण्यासाठी त्याने परीक्षा केंद्रावरून हजेरीपत्रकाची प्रत मिळवली असून, त्यावर त्याची उपस्थिती व स्वाक्षरी स्पष्टपणे नमूद आहे. या ठोस पुराव्यानिशी तो सध्या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे न्यायासाठी धाव घेत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निकालातील चुका, विलंब आणि गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अशा प्रकारांमुळे धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

MBA/MMS CET ला राज्यात 87.60% विद्यार्थ्यांची उपस्थिती! परीक्षे दरम्यान राज्यात कोणताही अनुचित प्रकार नाही

सध्या संबंधित विद्यार्थी परीक्षा विभागाच्या फेऱ्या मारत असून न्याय मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. मात्र, अद्यापही विद्यापीठाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात संबंधित यंत्रणा आणि परीक्षा विभागावर कोणती कारवाई केली जाते, तसेच विद्यार्थ्याला कधी न्याय मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांना त्वरित दिलासा देत परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त आणण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Web Title: Nagpur university bizarre declared absent despite appearing for exams academic year at risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Nagpur
  • Nagpur University

संबंधित बातम्या

Nagpur Crime: थरकाप उडवणारा प्रकार! वृद्धेला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेलं, अत्याचार केला आणि आतडी बाहेर येईपर्यंत…
1

Nagpur Crime: थरकाप उडवणारा प्रकार! वृद्धेला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेलं, अत्याचार केला आणि आतडी बाहेर येईपर्यंत…

Nagpur Crime: नागपुरातून एकाच कुटुंबातील पाच जण बेपत्ता; मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात
2

Nagpur Crime: नागपुरातून एकाच कुटुंबातील पाच जण बेपत्ता; मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.