Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paper Leak: नीट यूजी २०२६ पेपर लीकनंतर मोठा प्रशासकीय बदल; कोण आहेत उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव नरेश पाल गंगवार?

NEET UG 2026 Paper Leak: नीट यूजी २०२६ पेपर लीक प्रकरणादरम्यान केंद्राने मोठा प्रशासकीय फेरबदल केला असून, वरिष्ठ आयएएस अधिकारी नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 25, 2026 | 09:26 AM
new sachiv

new sachiv

Follow Us
Follow Us:

NEET UG 2026 Paper Leak: देशभरात ‘नीट यूजी २०२६’ पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. केंद्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण विभागाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. ते विनीत जोशी यांची जागा घेतील, ज्यांची सचिव स्तरावरील मोठ्या प्रशासकीय बदलांतर्गत पंचायती राज मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. या नियुक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव नरेश पाल गंगवार कोण आहेत, त्यांचे शिक्षण कुठे झाले आणि त्यांना किती वेतन मिळणार, याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

नरेश पाल गंगवार कोण आहेत?

नरेश पाल गंगवार हे राजस्थान कॅडरचे १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत, त्यांनी १९९३ मध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. या नियुक्तीपूर्वी ते मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयांतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागात सचिव पदावर कार्यरत होते. आता त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाची धुरा सोपवण्यात आली आहे. जवळपास ३ दशकांच्या आपल्या दीर्घ प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. राजस्थान सरकारमध्येही ते अनेक विभागांचे प्रमुख सचिव राहिले आहेत. तसेच केंद्र सरकारमध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात सहसचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे.

MPSC Big Decision: विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर MPSC चा मोठा निर्णय; संगणकीय परीक्षेचा निर्णय स्थगित!

नरेश पाल गंगवार यांचे शिक्षण कुठे झाले?

नरेश पाल गंगवार यांची शैक्षणिक पात्रता अत्यंत मजबूत मानली जाते. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ रुरकी येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये बीटेक केल्यानंतर आयआयटी दिल्ली येथून कम्युनिकेशन अँड रडार इंजिनियरिंगमध्ये एमटेकची पदवी मिळवली आहे. तांत्रिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एमए  देखील केले आहे.

राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांचे कलेक्टर राहिले आहेत

राजस्थान सरकारमध्ये सेवा बजावत असताना नरेश पाल गंगवार यांनी अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी (कलेक्टर) म्हणून काम पाहिले आहे. २००१ मध्ये त्यांची टोंकचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर त्यांनी सवाई माधोपुर, झालावाड़, जोधपुर आणि भरतपुर यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये कलेक्टरची जबाबदारी सांभाळली. २०१४ मध्ये त्यांना राजस्थान सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव बनवण्यात आले होते, जिथे त्यांनी दीर्घकाळ काम केले.

IIT Teacher Shortage: देशातील २३ आयआयटींमध्ये ३८% प्राध्यापकांची पदे रिक्त? पण पीएचडी होऊनही पदे का भरली जात नाहीत?

आता त्यांची जबाबदारी काय असणार?

उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नरेश पाल गंगवार देशाच्या उच्च शिक्षणाशी संबंधित धोरणांच्या अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळतील. त्यांच्या कार्यक्षेत्रात केंद्रीय विद्यापीठे, आयआयटी, एनआयटी, यूजीसी, तांत्रिक शिक्षण संस्था आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी (NEP) संबंधित अनेक मोठे निर्णय असतील. याशिवाय, सध्याच्या काळात परीक्षा प्रणालीवर विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा बहाल करणे हे शिक्षण मंत्रालयासमोर एक मोठे आव्हान मानले जात आहे.

आयएएस सचिवांचे वेतन किती असते?

उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नरेश पाल गंगवार यांना भारत सरकारचा सचिव स्तराचा पगार मिळेल. सातव्या वेतन आयोगामानुसार, भारत सरकारच्या सचिवाचा मूळ पगार २.२५ लाख रुपये प्रतिमहिना असतो. याशिवाय त्यांना महागाई भत्ता (DA), प्रवास भत्ता, सरकारी निवास, अधिकृत वाहन, ड्रायव्हर, स्टाफ आणि इतर शासकीय सुविधा देखील मिळतात.

Web Title: Naresh pal gangwar higher education secretary neet ug 2026 paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • NEET
  • NEET exam scam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

CJP Protest: मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारचा मोठा हातोडा! NTA च्या तब्बल ४७ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बडतर्फ
1

CJP Protest: मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारचा मोठा हातोडा! NTA च्या तब्बल ४७ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बडतर्फ

‘आता नोकरी नाही, विद्यार्थ्यांचा लढा महत्त्वाचा…’, कॉन्स्टेबलचा मोठा निर्णय, थेट अभिजित दीपके यांच्याकडे दिला राजीनामा
2

‘आता नोकरी नाही, विद्यार्थ्यांचा लढा महत्त्वाचा…’, कॉन्स्टेबलचा मोठा निर्णय, थेट अभिजित दीपके यांच्याकडे दिला राजीनामा

दिल्लीतील लाठीमारानंतर उद्धव ठाकरे आक्रमक! सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा; म्हणाले- ‘तुम्ही लाठ्या-बंदुका घेऊन या, मी…’
3

दिल्लीतील लाठीमारानंतर उद्धव ठाकरे आक्रमक! सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा; म्हणाले- ‘तुम्ही लाठ्या-बंदुका घेऊन या, मी…’

Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत? NEET आंदोलनादरम्यान मोठे कारण समोर
4

Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत? NEET आंदोलनादरम्यान मोठे कारण समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.