
फोटो सौजन्य - Social Media
आधी मुंबई तर आता नाशिक! स्वतः शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या जिल्ह्यात मराठी शाळा सुरक्षित नसल्याचे म्हणणे नाशिकात स्थानिक नागरिकांचे आहे. तसेच अशा प्रतिक्रिया राज्यभरातील मराठीप्रेमींकडून येत आहे. नाशिक जिल्ह्यात स्थित असणारी बिडी भालेकर शाळा ही नाशिकची ओळख आहे आणि या ओळखीला आता जमीनदोस्त केले जाणार आहे. १९६८ साली स्थापन करण्यात आलेल्या या शाळेला पाडण्याचा निर्णय आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आले आहे. या शाळेला पाडून तिथे विश्रामगृह तयार करण्याचा निर्धार स्थानिक प्रशासनाचा आहे. (Nashik Bidi Bhalekar School Will be Demolished)
पालिकेचा हा निर्णय स्थानिक नागरिक चिटाळून उठले आहेत. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आक्रोश ठोकला आहे आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या निर्णयाला विरोध होत आहे. या विरोधामागचे कारण म्हणजे ही येथील पहिली मराठी माध्यमिक शाळा आहे. तसेच या वस्तूला येथील नागरिकांच्या दृष्टीने ऐतिहासिक वास्तू म्हणून पाहिले जाते. हा विषय नागरिकांसाठी भावनात्मक विषय आहे. पालिकेने शाळा बंद असल्याचे कारण देत शाळेला पाडण्याचा निर्णय घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे.
जर हा निर्णय मागे झाला नाही तर तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू असे या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे, स्थानिक नागरिकांचे तसेच बचाव समितीचा म्हणणे आहे. शाळा, बिडी भालेकर मैदान आणि कालिदास कला मंदिर या येथील ऐतिहासिक आणि महत्वाच्या जागा असून त्यांना भांडवलदारांच्या फायद्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे आरोप येथील स्थानिक नागरिकांचे आहे.
शाळेची सध्याची अवस्था अत्यंत बिकट असून शाळा शेवटच्या घटका मोजते आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात मराठी शाळेवर संकट ओढावले आहे. पालिकेच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा बचाव समिती आणि माजी विद्यार्थ्यांकडून देण्यात आले आहे.