फोटो सौजन्य - Social Media
हरियाणा सरकारने राज्यातील विविध विभागांमध्ये कराराधारित आणि आउटसोर्स पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ‘हरियाणा कौशल रोजगार निगम लिमिटेड’ (HKRNL) ही प्रमुख संस्था स्थापन केली आहे. या माध्यमातून सरकारी विभाग, बोर्ड, कॉर्पोरेशन्स, कायदेशीर संस्था, राज्य विद्यापीठे आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील विविध एजन्सींमध्ये आवश्यक ते कर्मचारी पारदर्शक आणि एकसमान प्रक्रियेद्वारे नियुक्त केले जाणार आहेत. HKRNL चे अधिकृत पोर्टल hkrnl.itiharyana.gov.in हे कौशल्य विकास व औद्योगिक प्रशिक्षण विभागाच्या प्रशासनिक नियंत्रणाखाली कार्यरत असून उमेदवारांना विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देते.
7 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेली ही भरती मोहीम 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत खुली राहणार असून सर्व प्रवर्गातील उमेदवारांना पहिल्यांदा नोंदणीसाठी ₹236 शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. निवड प्रक्रियेसाठी HKRN ने एकूण 80 गुणांची मेरिट प्रणाली लागू केली असून यात कौटुंबिक उत्पन्न स्थितीला सर्वाधिक 40 गुण तर उमेदवाराचे वय, अतिरिक्त कौशल्ये, अतिरिक्त शैक्षणिक पात्रता, HSSC CET उत्तीर्णता आणि Ease of Deployment अशा घटकांना अनुक्रमे 10, 5, 5, 10 आणि 10 गुणांचे वजन देण्यात आले आहे.
HKRN अंतर्गत 30,000 रुपयांखालील मानधनाची अनेक पदे उपलब्ध असून 18 ते 42 वर्षे वयाची अट सर्व पदांसाठी लागू आहे. संबंधित पदांची यादी पोर्टलवर वेळोवेळी अपडेट होत असल्याने उमेदवारांनी नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. तर 30,000 रुपयांपेक्षा जास्त पगाराच्या Technical Associates श्रेणीतील पदांसाठी स्वतंत्र अधिसूचना जारी होणार आहे. याशिवाय HKRN Enterprises Jobs अंतर्गत EA to MD या पदासाठी एक रिक्त जागा जाहीर करण्यात आली आहे.
हरियाणा सरकारच्या या उपक्रमामुळे राज्यातील हजारो युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, विशेषतः HSSC CET उत्तीर्ण उमेदवारांना अतिरिक्त 10 गुण मिळणार असल्यामुळे त्यांच्यासाठी ही मोठी संधी ठरत आहे. इच्छुकांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पोर्टलवर उपलब्ध सूचना, पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची यादी काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण HKRN मार्फत होणारी भरती ही पूर्णपणे गुणांकनाधारित आणि पारदर्शक पद्धतीने पार पडते.






