Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी उचलला टोकाचा पाऊल

गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे नक्षीकच्या वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 08, 2026 | 08:35 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात घटना
  • आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या
  • घरात नायलॉन दोरीने गळफास घेतल्याची माहिती
नाशिक: नाशिक येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शहरातील प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी टोकाचा पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या डॉ. मनीषा जेजुरकर यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ आहे. या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

नायलॉन दोरीने घेतला गळफास

मृतक डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात कुटुंबासह राहत होत्या. गंगापूर रोड हा परिसर शहरातील शांत आणि उच्च्भ्रू समजला जातो. त्यांनी त्यांच्या राहत्या घरात शुक्रवारी नायलॉन दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अनुभवी आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून ओळख

डॉ. मनीषा जेजुरकर या शहरात एक कुशल आणि अनुभवी आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जात होत्या. आयुर्वेदिक उपचार आणि समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णनावर उपचार दिला. त्यांच्या उपचारपद्धतीमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला. त्यामुळे रुग्णांमध्येही त्या लोकप्रिय होत्या.

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

पती नामांकित मनोविकारतज्ज्ञ

त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मानसिक तणाव, नैराश्य आणि इतर मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना ते मार्गदर्शन करून उपचार देत असतात. समाजात मानसिक आरोग्याबाबत जागृती करण्याचेही त्यांचे काम सुरू असते. मात्र मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांच्या घरातच अशी दुर्दैवी घटना घडल्याने अनेकांना नियतीचा हा विचित्र खेळ वाटत आहे.

आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

दरम्यान, या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच गंगापूर रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या ठिकाणी कोणतीही सुसाईड नोट आढळली आहे की नाही, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या घटनेमागील कारणाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. या घटनेने नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: गंगापूर रोड परिसरातील राहत्या घरी ही घटना घडली.

  • Que: डॉ. मनीषा जेजुरकर कोण होत्या?

    Ans: त्या नाशिकमधील अनुभवी आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ओळखल्या जात होत्या.

  • Que: आत्महत्येमागील कारण काय आहे?

    Ans: सध्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Nashik crime excitement in nashik ayurvedic expert dr manisha jejurkar takes extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’
1

Ganesh Visarjan Traffic: गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
3

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Nashik Cyber Crime: थायलंडच्या नंबरवरून जिल्हाधिकाऱ्यांचा ‘फेक’ अकाउंट; ‘Hello… How are you?’ मेसेज अन्…
4

Nashik Cyber Crime: थायलंडच्या नंबरवरून जिल्हाधिकाऱ्यांचा ‘फेक’ अकाउंट; ‘Hello… How are you?’ मेसेज अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.