Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! डॉ. मनीषा जेजुरकरांची आत्महत्या, मनोविकारतज्ज्ञ पतीवर गंभीर आरोप; पती फरार

नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली. पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्या मानसिक छळामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 09, 2026 | 09:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात डॉक्टर महिलेची आत्महत्या
  • मृत महिलेचे नाव डॉ. मनीषा जेजुरकर
  • पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्यावर मानसिक छळाचा आरोप
नाशिक: नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिला डॉक्टरने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव डॉक्टर मनीषा निलेश जेजुरकर असे आहे. या नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याऱ्या डॉक्टरचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर आहे. ते शहरातील प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ आहेत. दोघेही दाम्पत्य नाशिकच्या जिल्ह्या रुग्णलयात कार्यरत असून या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरु होते. आणि याच वादातून डॉक्टर मनीषा यांनी आत्महत्या केली असे माहेरच्या नातेवाईकांनी निलेश जेजुरकर यांच्यावर केले आहे.

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा

माहेरच्यांनी केलेलं आरोप काय?

डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येंनंतर माहेरच्यांनी त्यांच्या पती विरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. मनीषा यांचे पती निलेश जेजुरकर हे वारंवार मनीषा यांना त्रास देत होते, हे त्यांच्या कुटुंबाला देखील माहिती होते.मात्र, आम्ही अनेकदा चर्चेसाठी त्यांना बोलावलं मात्र एक ना अनेक कारणांनी त्यांनी चर्चा होऊ दिली नाही. मनीषा यांना होणारा वारंवार मानसिक त्रास असह्य झाल्याने त्यांनी अखेर त्यांची जीवनयात्रा संपली. मात्र, या संपूर्ण प्रकरणात ही आत्महत्या मनीषा यांनी का केली, याची अनेक कारणे आहेत या संदर्भात पोलिसांनी सखोल तपास करावा आणि न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती मनीषा यांच्या भावांकडून करण्यात आली. मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. निलेश जेजुरकर यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या बहिणीला दीड वर्षांपासून मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणातील इतर आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर देखील कारवाई करत न्याय मिळावा, अशी मागणी मनीषा यांचे भाऊ हेमंत भास्कर यांनी केली.

पोलीस तपास सुरु

डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर रोड परिसरात असेलेल्या राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली. मनीषा यांच्या माहेरच्यांनी नक्षीच्या गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. गंगापूर पोलिसांनी मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी डॉक्टर निलेश जेजुरकर हे फरार आहे. गंगापूर पोलीस तसेच क्राइम ब्रांच हे शोध घेत आहे. पुढील तपास देखील करत आहेत.

Wardha Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात ही घटना घडली.

  • Que: मृत महिला कोण होत्या?

    Ans: डॉ. मनीषा जेजुरकर या डॉक्टर असून त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.

  • Que: कुटुंबीयांनी कोणावर आरोप केले?

    Ans: त्यांच्या पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्यावर मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Web Title: Nashik crime sensation in nashik dr manisha jejurkar commits suicide serious allegations against psychiatrist husband husband absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • crime news
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा
1

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा

गोळीबार करणाऱ्या ‘त्या’ दोघांच्या आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडले
2

गोळीबार करणाऱ्या ‘त्या’ दोघांच्या आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडले

Nanded News : अवैध रेती उत्खननावर छापे! DIGच्या पथकाची कारवाई, १ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Nanded News : अवैध रेती उत्खननावर छापे! DIGच्या पथकाची कारवाई, १ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

धक्कादायक ! तरुणीवर सातत्याने अत्याचार; अत्याचाराचे फोटोही काढले अन् तेच नंतर पॉर्न साईटवर अपलोड केले
4

धक्कादायक ! तरुणीवर सातत्याने अत्याचार; अत्याचाराचे फोटोही काढले अन् तेच नंतर पॉर्न साईटवर अपलोड केले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.