Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : मयुरेश आढावची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी; ‘पिकासो आर्ट कॉन्टेस्ट’मध्ये पटकावला ‘स्टार आर्टिस्ट’ बहुमान!

नाशिकची भूमी ही कलावंतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि याच परंपरेचा वारसा पुढे चालवत अवघ्या १४ वर्षांच्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव कोरलं आहे. नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे,

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 25, 2026 | 03:29 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अवघ्या १४ वर्षांच्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव कोरलं
  • गोदाकाठच्या संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय सादरीकरण
  • आंतरराष्ट्रीय ज्युरींकडून 14 वर्षीय मयुरेशचं कौतुक
Nashik News : नाशिकची भूमी ही कलावंतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि याच परंपरेचा वारसा पुढे चालवत अवघ्या १४ वर्षांच्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव कोरलं आहे. नाशिकच्या मयुरेश राजेंद्र आढाव या अवघ्या १४ वर्षांच्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय चित्रकला क्षेत्रात नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रतिष्ठित ‘पिकासो आर्ट कॉन्टेस्ट – क्रिएटिव्ह ब्रिलिअन्स २०२६’ या जागतिक स्पर्धेत मयुरेशची ‘स्टार आर्टिस्ट’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

Jobs 2026 : परीक्षा न देता बनू शकता ‘बस कंडक्टर’; महिलांसाठी आहे विशेष संधी, वाचा सविस्तर

गोदाकाठच्या संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय सादरीकरण

मयुरेशने या स्पर्धेसाठी नाशिकच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या गोदाकाठचे मंदिर आणि वाडा यांचे जलरंगातील (Watercolor) सुंदर चित्र साकारले होते. नाशिकच्या प्राचीन वास्तुकलेचा वारसा आणि गोदावरीच्या काठावरील शांतता मयुरेशने आपल्या कुंचल्यातून कागदावर जिवंत केली. त्याच्या या कलाकृतीने आंतरराष्ट्रीय परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

जगभरातील स्पर्धकांशी झुंज

या स्पर्धेत जगभरातील ६ ते १९ वयोगटातील हजारो तरुण कलाकारांनी सहभाग घेतला होता. वॉटरकलर, एक्रेलिक, ऑइल आणि मिक्स्ड मीडिया अशा विविध माध्यमांचा वापर करण्याची मुभा असल्याने ही स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक आणि स्पर्धात्मक होती. अशा अटीतटीच्या स्पर्धेत मयुरेशने आपल्या कौशल्याच्या जोरावर ९० ते १०० गुण मिळवून ‘स्टार आर्टिस्ट’ हा सर्वोच्च किताब पटकावला.

आंतरराष्ट्रीय ज्युरींकडून कौतुक

या स्पर्धेचे परीक्षण जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांनी केले. यामध्ये युनायटेड किंगडमच्या द युनिव्हर्सिटी ऑफ डर्बी येथील व्हीनस बेहजाती आणि इजिप्तच्या हेलवान युनिव्हर्सिटीच्या डॉ. घादा एल झायात यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश होता. सर्जनशीलता, नावीन्य आणि सादरीकरण या ‘ICEPAPA’ निकषांवर मयुरेशची कलाकृती सरस ठरली.

‘हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान

या यशाचा भाग म्हणून मयुरेशच्या चित्राचे प्रकाशन पिकासो आर्ट कॉन्टेस्टच्या अधिकृत वेब प्लॅटफॉर्मवर केले जाणार आहे. तसेच, त्याला जागतिक स्तरावरील ‘हॉल ऑफ फेम’ मध्येही स्थान देण्यात आले आहे. मयुरेशने यापूर्वीही अनेक प्रदर्शने आणि स्पर्धांमध्ये आपल्या कलेचा ठसा उमटवला असून, त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्यास शाळांवर होणार कठोर कारवाई; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा थेट इशारा

Web Title: Nashik student mayuresh adhav wins star artist picasso art contest 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Drawing
  • international news
  • Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
1

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
2

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.