Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Scholarship: परदेशी विद्यापीठात शिकायचंय पण खिशाचा विचार करताय? मग ‘या’ सरकारी शिष्यवृत्तीचा नक्की लाभ घ्या.

भारत सरकारच्या National Overseas Scholarship २०२६-२७ ची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याद्वारे SC, भटक्या जमाती आणि भूमिहीन मजुरांच्या पाल्यांना परदेशात शिक्षणासाठी १००% अर्थसाहाय्य मिळणार.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 10, 2026 | 11:50 AM
National Overseas Scholarship

National Overseas Scholarship

Follow Us
Follow Us:

National Overseas Scholarship:परदेशात पदवी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.यंदा भारत सरकार पूर्णपणे अर्थसहाय्यित (Fully-funded) शिष्यवृत्तीवर विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवणार आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप (NOS)  ची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी २ जूनपर्यंत पोर्टल खुले राहणार असून इच्छुकांना या कालावधीत अर्ज करावा. तसेच अर्जातील चुका सुधारण्यासाठी ७ जूनपर्यंत करेक्शन विंडो खुली असेल.

नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप म्हणजे काय?

NOS ही एक सरकारी योजना आहे, ज्याद्वारे समाजातील उपेक्षित घटकांमधील विद्यांर्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थिक मदत दिली जाते. यामध्ये अनुसूचित जाती (SC),  विमुक्त भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर या प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात. या योजनेद्वारे परदेशात पदव्युत्तर (Masters) आणि पीएचडी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे अर्थसहाय्य केले जाते.

Thalapathy Vijay : थलपती विजयची १०वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल! गणित आणि विज्ञानातील मार्क पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

अर्जाची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या अटी:

विद्यार्थ्यांना सर्वात आधी NOS च्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर वैयक्तीक, शैक्षणिक आणि आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करावा लागेल. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, एकदा नोंदणी झाल्यानंतर पुन्हा त्यात बदल करता येणार नाही. तसेच अर्जामध्ये चुका अढळल्यास तो फेटाळला जाईल. २ जून रोजी मुख्य अर्ज प्रक्रिया बंद झाल्यानंतर  ४ जून ते ७ जून याकालावधीत दुरुस्तीसाठी ४ दिवसांची मुदत दिली जाईल.

पात्रता निकष:

  1. अर्जदाराचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी असावे.
  2. अर्ज भरताना रहिवासी पुरावा, शैक्षणिक पात्रता आणि परदेशी विद्यापीठातील प्रवेशाची स्थिती यांसारखी माहिती देणे आवश्यक आहे.
  3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि पात्र प्रवर्ग यांची माहिती देणे अनिवार्य आहे.
  4. पीएचडीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधनाचा विषय(Research Topic) आणि संक्षिप्त गोषवारा देणे आवश्यक आहे.
Indian Army : अग्निवीर परीक्षेचे हॉल तिकीट कधी येणार? पाहा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत!

आवश्यक कागदपत्रे: अर्ज करताना उमेद्वाराला काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागते. ज्यांमध्ये ओळखपत्र, जातीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका, कुटुंबातील सदस्याचे उत्पन्न आणि परदेशी विद्यापीठाचे प्रवेशपत्र (Admission Offer Letter) यांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रे दिलेल्या फॉरमॅटमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.

या योजनेचा उद्देश अल्पप्रतिनिधित्व असलेल्या गटातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास करणे हा आहे.

 

Web Title: National overseas scholarship nos 2026 27 application process eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Abroad Trip
  • Exam
  • OBC Scholarship

संबंधित बातम्या

Passing Marks History: परीक्षेत पास होण्यासाठी ‘३३ टक्के’ गुणच का लागतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण..
1

Passing Marks History: परीक्षेत पास होण्यासाठी ‘३३ टक्के’ गुणच का लागतात? जाणून घ्या यामागचे नेमके कारण..

TET Exam 2026: ‘नीट’च्या गोंधळानंतर ‘टीईटी’साठी प्रशासन अलर्ट! संभाजीनगरमध्ये २९ हजारांहून अधिक भावी शिक्षकांची परीक्षा
2

TET Exam 2026: ‘नीट’च्या गोंधळानंतर ‘टीईटी’साठी प्रशासन अलर्ट! संभाजीनगरमध्ये २९ हजारांहून अधिक भावी शिक्षकांची परीक्षा

SSC Topper Maharashtra : १०० टक्के गुण, राज्यात प्रथम क्रमांक; तरीही श्रेयस तांबे राज्यस्तरीय पुरस्काराच्या प्रतीक्षेत
3

SSC Topper Maharashtra : १०० टक्के गुण, राज्यात प्रथम क्रमांक; तरीही श्रेयस तांबे राज्यस्तरीय पुरस्काराच्या प्रतीक्षेत

Internet Ban in Exams: परीक्षांमध्ये पेपर लीक रोखण्यासाठी थेट इंटरनेटच बंद? भारतातच नव्हे तर ‘या’ देशांमध्येही आहेत कडक नियम!
4

Internet Ban in Exams: परीक्षांमध्ये पेपर लीक रोखण्यासाठी थेट इंटरनेटच बंद? भारतातच नव्हे तर ‘या’ देशांमध्येही आहेत कडक नियम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.