फोटो सौजन्य -सोशल मीडिया
Thalapathy Vijay 10th Result: तमिळनाडूचे प्रसिद्ध अभिनेते आणि नेते थलपती विजय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांची १० वीची मार्कशीट सोशल मीडियावर वायरल होत आहे. विजय यांनी चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावले असून त्यांनी राजकारणातही मजबूत पाऊल टाकले आहे. त्यांच्या पक्षाच्या दमदार कामगिरीनंतर त्यांचे नाव अधिकच चर्चेत आले आहे.
विजय यांना १०वीच्या बोर्ड परीक्षेत एकूण ११०० पैकी ७११ मिळाले होते. याची टक्केवारी ६५ टक्क्यांच्या आसपास येते. त्यांना तमिळमध्ये २०० पैकी १५५ गुण तर इंग्रजीत १३३ तसेच विज्ञानात २०६ गुण मिळाले होते. दुसरीकडे सामाजिक शास्त्रात ३०० पैकी १२२ गुण मिळाले होते. तर गणितात २०० पैकी ९५ गुण मिळाले होते. त्यांना सर्वात कमी गुण हे गणित विषयांत होते.
विजय यांचे प्राथमिक शिक्षण चेन्नईच्या कोदंबक्कम येथील फातिमा स्कूलमधून पूर्ण झाले. तर पदवीचे शिक्षण लोयोला कॉलेजमधून पूर्ण झाले होते. लहानपणापासूनच अभिनयाची ओढ असलेल्या विजयने कालांतराने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि हळूहळू ते मोठे सुपरस्टार बनले. तीन दशकाहून अधिक काळ त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत काम केले असून त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
आता ते पूर्णपणे राजकारणात सक्रिय असून त्यांनी TVK हा स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चांगली कामगिरी करत त्यांनी १०८ जागा जिंकल्या आहेत. तर विजय स्वत: दोन जागांवरून निवडून आले आहेत. सध्या त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी काही आमदारांच्या समर्थनाची गरज आहे.
आता विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावाही सादर केला आहे. त्यांचा राजकीय प्रवास आता वेगाने पुढे जात आहे. त्यांची जुनी मार्कशीट पुन्हा चर्चेत आल्याने हे सिद्ध होते की, कमी किंवा जास्त गुण हे आपले भविष्य ठरवत नाहीत. माणसाची मेहनत योग्य़ दिशेने असेल तर माणूस कोणत्याही शिखरावर पोहचू शकतो.






