Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Recruitment 2026: MPSC विद्यार्थ्यांसाठी दिवाळी गिफ्ट! गट-क भरतीत पदसंख्या वाढली; आता १६ हजार ७१७ जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भरतीतील पदसंख्या वाढवून आता १६ हजार ७१७ पदांसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याशिवाय उमेदवारांना वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता, तसेच नव्याने अर्ज आणि विकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 07, 2026 | 11:33 AM
MPSC विद्यार्थ्यांसाठी दिवाळी गिफ्ट! गट-क भरतीत पदसंख्या वाढली; आता १६ हजार ७१७ जागांसाठी भरती

MPSC विद्यार्थ्यांसाठी दिवाळी गिफ्ट! गट-क भरतीत पदसंख्या वाढली; आता १६ हजार ७१७ जागांसाठी भरती

Follow Us
Follow Us:
  • एमपीएससी विद्यार्थ्यांना दिवाळीची मोठी भेट!
  • गट-क भरतीत पदसंख्या वाढली
  • आता १६ हजार ७१७ पदांसाठी परीक्षा
 

पोपट पिटेकर,अहिल्यानगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली असून, आता तब्बल १६ हजार ७१७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (MPSC Recruitment 2026)

आमदार विक्रम पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान MPSC परीक्षेतील पदसंख्या वाढविण्यासह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पदसंख्या वाढविण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला असल्याची प्रतिक्रिया आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केली.

Women in Management Report: कोणत्या देशात सर्वाधिक महिला मॅनेजर; भारताचा कितवा क्रमांक?

पदसंख्या आणि उमेदवारांचे प्रमाण १:१०० असावे

परीक्षेतील पदसंख्या आणि उमेदवारांचे प्रमाण किमान १:१०० असावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. काही हजार पदांसाठी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसतात. त्यामुळे पदांची संख्या वाढविल्यास अधिकाधिक उमेदवारांना सरकारी सेवेत दाखल होण्याची संधी उपलब्ध होईल, असे आमदार पाचपुते यांनी सांगितले. आता १६ हजार ७१७ पदांसाठी भरती होणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता

दरम्यान, मागील काही काळात विविध कारणांमुळे भरती प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेच्या अटीमुळे परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत किमान एक वर्षाची शिथिलता देण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणीदेखील मान्य करण्यात आल्याचे आमदार पाचपुते यांनी स्पष्ट केले.

नव्याने अर्ज आणि विकल्प भरण्याची संधी

पदसंख्येत वाढ झाल्यानंतर उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची तसेच विकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव पदांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांप्रमाणेच आता युवकांच्या प्रश्नांनाही प्राधान्य दिले आहे. व्ही. राधा समितीने केलेल्या शिफारशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केल्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले.

MBA with AI vs General MBA यांपैकी कोणता पर्याय उत्तम? करिअर, पगार आणि भविष्यातील संधी जाणून घ्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: MPSC गट-क भरतीमध्ये आता किती पदे असणार आहेत?

    Ans: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील पदसंख्या वाढवून आता एकूण १६ हजार ७१७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

  • Que: MPSC उमेदवारांना वयोमर्यादेत किती शिथिलता मिळणार आहे?

    Ans: भरती प्रक्रिया रखडल्यामुळे उमेदवारांना वयोमर्यादेत किमान एक वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले.

  • Que: उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे का?

    Ans: होय. उमेदवारांना नव्याने अर्ज आणि विकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

Web Title: Mpsc group c recruitment 16717 vacancies posts increased age relaxation sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Exam
  • MPSC

संबंधित बातम्या

CA Foundation Result 2026: प्रतीक्षा संपली! आज सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर होणार; ‘या’ लिंकवर पाहा स्कोरकार्ड!
1

CA Foundation Result 2026: प्रतीक्षा संपली! आज सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर होणार; ‘या’ लिंकवर पाहा स्कोरकार्ड!

MPSC Group C Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! MPSC गट-क परीक्षेची पदसंख्या तब्बल…
2

MPSC Group C Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! MPSC गट-क परीक्षेची पदसंख्या तब्बल…

SSC Exam Schedule: SSC ची मोठी घोषणा! नोव्हेंबर २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ परीक्षेच्या तारखांमध्येही मोठे बदल
3

SSC Exam Schedule: SSC ची मोठी घोषणा! नोव्हेंबर २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ परीक्षेच्या तारखांमध्येही मोठे बदल

NTA Reforms 2026: एनटीएच्या कार्यपद्धतीत मोठे फेरबदल! परीक्षा प्रणाली ‘फुल-प्रूफ’ करण्यासाठी उचलली ‘ही’ मोठी पावले
4

NTA Reforms 2026: एनटीएच्या कार्यपद्धतीत मोठे फेरबदल! परीक्षा प्रणाली ‘फुल-प्रूफ’ करण्यासाठी उचलली ‘ही’ मोठी पावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.