Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Student Suicide News: देशभरात सर्वाधिक विद्यार्थी आत्महत्या ‘या’ राज्यात , गेल्या १० वर्षांतील आकडेवारी समोर

Maharashtra Student Suicide News: NCRB च्या अहवालानुसार, गेल्या एका दशकात देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात ८० टक्क्यांनी वाढ झाली असून २०२४ मध्ये १४,४८८ विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे. यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 01, 2026 | 09:46 AM
student suicide

student suicide

Follow Us
Follow Us:

Maharashtra Student Suicide News:  देशातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याविषयीची चिंता सतत वाढत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, गेल्या एका दशकात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०२४ मध्ये देशभरात एकूण १४,४८८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, जी २०१४ च्या तुलनेत सुमारे ८० टक्क्यांनी जास्त आहे. हा आकडा गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यास, स्पर्धा परीक्षा आणि पारिवारिक दबावासंदर्भातील गंभीर चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे

NCRB च्या आकडेवारीनुसार, २०१४ ते २०२४ या ११ वर्षांच्या काळात देशभरात एकूण १,२३,९१८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यापैकी सर्वाधिक सुमारे १७,००० प्रकरणे एकट्या महाराष्ट्रातून समोर आली आहेत. यानंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागतो, जिथे हा आकडा सुमारे १०,००० राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बाबतीत सातत्याने महाराष्ट्र देशात सर्वात पुढे आहे.

कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणे आहेत?

अहवालानुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या चार राज्यांमध्ये मिळून देशभरातील विद्यार्थ्यांच्या एकूण आत्महत्येच्या प्रकरणांपैकी सुमारे अर्धा हिस्सा नोंदवला जातो. विशेष म्हणजे, यातील बहुतांश प्रकरणे अशा भागांशी जोडलेली आढळली आहेत, जिथे मोठे कोचिंग हब आहेत; जसे की राजस्थानचे कोटा, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यांसारखी शहरे, जिथे देशभरातून लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात.

आत्महत्येची मुख्य कारणे काय आहेत?

NCRB च्या अहवालानुसार, विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे सर्वात मोठे कारण कौटुंबिक समस्या राहिले असून, त्यानंतर परीक्षेतील अपयश हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कारण समोर आले आहे. २०२४ मध्ये केवळ परीक्षेतील अपयशामुळे २,०३२ आत्महत्या झाल्या, जी त्या वर्षी नोंदवलेल्या विद्यार्थ्यांच्या एकूण आत्महत्येच्या प्रकरणांपैकी सुमारे १४ टक्के आहे.

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन

आकडेवारी सातत्याने का वाढत आहे?

गेल्या एका दशकातील आकडेवारीवर नजर टाकल्यास, २०१९ ते २०२० दरम्यान सर्वात वेगवान वाढ नोंदवली गेली होती, जेव्हा प्रकरणांमध्ये २१.२ टक्क्यांची वाढ झाली. या १० वर्षांमध्ये केवळ २०२२ हेच असे वर्ष होते, जेव्हा आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये किरकोळ घट नोंदवली गेली. याशिवाय, २०२४ मध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या १०,२९५ हून अधिक मुलांचा मृत्यू देखील आत्महत्येमुळे झाला, जो हे दर्शवतो की ही समस्या केवळ कॉलेज किंवा मोठ्या वयातील विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नाही, तर शाळकरी मुलांमध्येही खोलवर पसरलेली आहे.

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?

सरकारकडून काय प्रयत्न केले जात आहेत?

ही वाढती समस्या पाहता केंद्र सरकारने २०२२ मध्ये ‘नॅशनल सुसाइड प्रिवेंशन स्ट्रॅटेजी’ (राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण) सुरू केली, ज्याचे लक्ष २०३० पर्यंत देशातील आत्महत्येच्या दरात १० टक्क्यांची घट करणे आहे. याशिवाय, कोटा सारख्या कोचिंग हबमध्येही प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी कौन्सिलिंग सेंटर, हेल्पलाइन नंबर आणि नियमित मेंटल हेल्थ चेकअप यांसारख्या सुविधा सुरू केल्या आहेत, जेणेकरून दबावाखाली जगत असलेल्या विद्यार्थ्यांना वेळेवर योग्य आधार मिळू शकेल.

Web Title: Ncrb report student suicide news rise in india maharashtra top

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • education
  • Maharashtra student
  • mental health
  • Student Suicide

संबंधित बातम्या

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..
1

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?
2

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल
3

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह
4

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.