Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Exam Stress: नीट परीक्षेच्या तणावातून ‘या’ राज्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; एकदा वाचाच धक्कादायक रिपोर्ट

NEET Exam Stress 2026: नीट परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयानंतर ५ विद्यार्थ्यांसह यंदा एकूण १४ विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा रिपोर्ट समोर आला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 17, 2026 | 03:25 PM
नीट

नीट

Follow Us
Follow Us:

NEET Exam Stress: देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट (NEET 2026) यंदा पेपरफुटी प्रकरण आणि परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रचंड चर्चेत राहिली आहे. लाखो विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत होते. मात्र, परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान समोर आलेल्या एका धक्कादायक रिपोर्टने सर्वांची चिंता वाढवली आहे. या रिपोर्टनुसार, वर्ष २०२६ मध्ये आतापर्यंत नीट परीक्षेशी संबंधित किमान १४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे गुन्हे समोर आले आहेत. यातील ५ घटना तर परीक्षा रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर घडल्याचे सांगितले जात आहे.

डॉक्टर बनण्याचे स्वप्न घेऊन यंदा तब्बल २३ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर चांगल्या गुणांची अपेक्षा असतानाच पेपर लीकच्या आरोपांमुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला आहे.

रिपोर्टमध्ये काय धक्कादायक माहिती समोर आली?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कालावधीत ‘नीट’शी संबंधित किमान ९३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. रिपोर्टनुसार, वर्ष २०२५ मध्ये अशा घटनांची संख्या सर्वाधिक होती, जेव्हा किमान ३२ विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले. या वर्षात आतापर्यंत १४ गुन्हे समोर आले आहेत. विशेष म्हणजे, १२ मे २०२६ रोजी परीक्षा रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर त्यापैकी ५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

NCERT Book Controversy: ९ वीच्या नव्या पुस्तकात सिंधू संस्कृतीतील ‘Dancing Girl’ चा फोटो बदलला; धड झाकल्याने तज्ज्ञांचा आक्षेप

(टीप: ही आकडेवारी मीडिया रिपोर्ट्स आणि ओपन-सोर्स विश्लेषणावर आधारित आहे. शासनाने याला अधिकृत आकडेवारी म्हणून प्रमाणित केलेले नाही.)

कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे?

अहवालानुसार बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यांतून सर्वाधिक केसेस समोर आल्या आहेत. या आकडेवारीनुसार, दर ५ पैकी १ घटना ही बिहारमधील विद्यार्थ्यांशी संबंधित आहे.

तज्ज्ञांच्या मते, वैद्यकीय प्रवेश परीक्षांमधील वाढती स्पर्धा, पालकांच्या अवाजवी अपेक्षा आणि यशासाठी असलेला सामाजिक दबाव यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अनेक कुटुंबे आर्थिक कर्ज काढून मुलांना या परीक्षेसाठी पाठवत असल्याने विद्यार्थ्यांवर एक वेगळाच ताण निर्माण झाला आहे.

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये वैज्ञानिक संशोधनाची सुवर्णसंधी! अर्ज प्रक्रिया जाणून घ्या एका क्लिकवर..

‘कोटा’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी

राजस्थानमधील कोटा शहर हे देशातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी (Engineering) कोचिंगचे सर्वात मोठे हब मानले जाते. देशभरातून लाखो तरुण येथे तयारीसाठी येतात. मात्र, हा रिपोर्ट सांगतो की, २०२१ ते २०२६ या काळात झालेल्या एकूण आत्महत्येच्या घटनांपैकी किमान ४० केसेस एकट्या कोटामध्ये घडल्या आहेत. याच कारणामुळे कोटा येथील कोचिंग संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Neet exam stress student suicide cases kota coaching stress paper leak marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • NEET Exam
  • Student Died
  • Sucide
  • Sucide News

संबंधित बातम्या

NEET परीक्षेपूर्वी बंदीच्या निर्णयाविरोधात ‘Telegram’ थेट हायकोर्टात; तातडीने सुनावणी घेण्याची विनंती मंजूर!
1

NEET परीक्षेपूर्वी बंदीच्या निर्णयाविरोधात ‘Telegram’ थेट हायकोर्टात; तातडीने सुनावणी घेण्याची विनंती मंजूर!

NEET UG Re-Exam: नीट परीक्षेसाठी भारतात Telegram बॅन; पण बंदीनंतरही ॲप कसं चालतंय? सायबर तज्ज्ञाचा खळबळजनक दावा
2

NEET UG Re-Exam: नीट परीक्षेसाठी भारतात Telegram बॅन; पण बंदीनंतरही ॲप कसं चालतंय? सायबर तज्ज्ञाचा खळबळजनक दावा

Internet Ban in Exams: परीक्षांमध्ये पेपर लीक रोखण्यासाठी थेट इंटरनेटच बंद? भारतातच नव्हे तर ‘या’ देशांमध्येही आहेत कडक नियम!
3

Internet Ban in Exams: परीक्षांमध्ये पेपर लीक रोखण्यासाठी थेट इंटरनेटच बंद? भारतातच नव्हे तर ‘या’ देशांमध्येही आहेत कडक नियम!

Telegram Ban: नीट परीक्षेसाठी आयटी मंत्रालयाने घेतलेल्या ‘या’ मोठ्या निर्णयावर Telegram Ceo संतापले!
4

Telegram Ban: नीट परीक्षेसाठी आयटी मंत्रालयाने घेतलेल्या ‘या’ मोठ्या निर्णयावर Telegram Ceo संतापले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.