Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

paper leak 2026: ऑनलाइन परीक्षा तरीही पेपर लीक?’कॉकरोच जनता पार्टी’ने SSC GD पेपरफुटीवर उपस्थित केले प्रश्न?

paper leak 2026 : नीट पेपरफुटीनंतर परीक्षा ऑनलाइन (CBT) घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय खरोखरच सुरक्षित आहे का? उत्तर प्रदेशात एसएससी जीडी परीक्षेची सिस्टीम घरबसल्या हॅक करून ४ लाख रुपयांना पेपर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर यंत्रणेवर काय प्रश्न उपस्थित होत आहेत? जाणून घ्या सविस्तर

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 25, 2026 | 01:39 PM
COCKROACH JANATA PARTY

COCKROACH JANATA PARTY

Follow Us
Follow Us:

paper leak 2026 : देशात नीट(NEET) पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता एसएससी जीडी भरती परीक्षेसी संबंधित आणखी एक घोटाळा समोर आला आहे. उत्तर प्रदेश कृती दलाने (UP STF) या परीक्षेत सुरू असलेल्या एका मोठ्या हायटेक कॉपीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कर्मचारी निवड आयोगाच्या जीडी म्हणजेच जनरल ड्युटी भरती परीक्षेचा पेपर लाखो रुपयांना विकला गेला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशाच्या कृती दलाने ग्रेटर नोएडा येथून ७ जणांना ताब्यात घेतले असून आरोपींकडून ५० लाख रुपयांची रक्कमही जप्त केली आहे.

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारने सक्त धोरणे आखत पुढील वर्षापासून नीट परीक्षा ऑनलाइन सीबीटी(Computer Based Test) मोडमध्ये घेण्याचे ठरवले होते. मात्र, ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या एसएससी जीडी भरतीचा पेपर ४ लाख रुपयांना विकल्याचे उघड झाल्यानंतर आता पुन्हा हा सीबीटी (Computer Based Test) मोड पेपरफुटी रोखण्याचा खात्रीशीर उपाय आहे का? यावर प्रश्न उपस्थित होत आहे.

काय सीबीटी (CBT) मोड हा पेपरफुटी रोखण्याचा ठोस उपाय आहे?

ऑनलाइन परीक्षा लीक होण्याची पहिली वेळ नाही. एसएससी जीडी भरती परीक्षेच्या पेपरफुटीपूर्वी हॅकिंग, रिमोट ॲक्सेस आणि परीक्षा केंद्र चालकांच्या संमतीने पेपर लीक झाले आहेत. जर पेन-पेपर मोड परीक्षेत प्रत्यक्ष कागदपत्रे गळती होण्याचा धोका असतो तर सीबीटी मोडमध्ये रिमोट ॲक्सेस, हॅकिंग आणि सॉल्व्हर गँगकडून सिस्टीम हॅक केली जाण्याचा धोका कायम असतो.

UPSC Recruitment 2026: यूपीएससीकडून बंपर भरती; सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

‘कॉकरोच जनता पार्टी‘ने नीट पेपरफुटीवर उपस्थित केले प्रश्न?

या घोटाळ्यानंतर सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कॉकरोच जनता पार्टी नावाच्या एका ट्विटर (X) हँडलवरून नीट आणि एसएसी जीडी पेपर फुटीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

“नीट परीक्षा पुढील वर्षी कॉम्प्युटर बेस्ड (ऑनलाइन) होणार आहे, पण हा खरोखरच पेपरफुटीचा तोडगा आहे का? जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही? एसएससी जीडीची परीक्षा झाली होती पण सॉल्वर गँगने घरबसल्या सिस्टम हॅक करून त्याचा प्रश्न सोडवला. मग काय आहे, हे तरुणांची फसवणुक नव्हे काय?

Career Tips: केवळ पदवी असून उपयोग काय? कॉर्पोरेट कंपन्यांना आता मार्कशीटपेक्षा विद्यार्थ्यांच्या ‘या’ कौशल्यांना देतात महत्त्व

पेपरफुटीवर कशा प्रकारे रोकड लावता येईल?

ऑनलाइन परीक्षांमधील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत सुरक्षित तंत्रज्ञान हाच एकमेव उपाय आहे. देशातील मोठ्या ऑनलाइन परीक्षांसाठी अशा सॉफ्टवेअरचा वापर करावा लागेल, जे कोणत्याही ‘थर्ड पार्टी’ किंवा ‘रिमोट ॲक्सेस टूल’ला कॉम्प्युरमध्ये प्रवेश देणार नाहीत. ज्यामुळे कॉम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टिम हॅक होण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होईल.

Web Title: Neet paper leak ssc gd online exam scam up stf hacking cbt mode security flaws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • Government Job
  • NEET exam scam

संबंधित बातम्या

NIOT Recruitment 2026: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीमध्ये भरती सुरू; कोण करू शकतं अर्ज आणि काय आहेत अटी?
1

NIOT Recruitment 2026: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीमध्ये भरती सुरू; कोण करू शकतं अर्ज आणि काय आहेत अटी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.