Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET PG २०२६ ची उत्तरतालिका कधी जाहीर होणार? जाणून घ्या मार्किंग स्कीम आणि फेरपरीक्षेचे वेळापत्रक!

NEET PG 2026 Answer Key & Updates: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBEMS) द्वारे आयोजित नीट पीजी २०२६ ची उत्तरतालिका कधी येणार? १८० प्रश्नांच्या या पेपरची मार्किंग स्कीम काय असून समान गुण मिळाल्यास रँक कशी ठरवली जाईल? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 31, 2026 | 03:42 PM
neet pg

neet pg

Follow Us
Follow Us:

NEET PG 2026 Answer Key & Updates: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने ३० ऑगस्ट २०२६ रोजी नीट पीजी परीक्षा आयोजित केली होती. परीक्षा संपल्यानंतर आता उमेदवारांना आंसर कीची प्रतीक्षा आहे. NBEMS लवकरच आपल्या अधिकृत वेबसाइटवर उत्तरतालिका जाहीर करू शकते. अधिकृत उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर उमेदवार परीक्षेतील आपल्या उत्तरांची पडताळणी करू शकतील. याद्वारे त्यांना आपल्या संभाव्य गुणांचा अंदाज लावता येईल.

१८० प्रश्नांचा होता पेपर

यावर्षी नीट पीजी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये प्रश्नांची संख्या कमी करण्यात आली होती. परीक्षेत एकूण १८० बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते आणि संपूर्ण पेपरसाठी कमाल ७२० गुण निर्धारित होते. यापूर्वी परीक्षेत २०० प्रश्न असायचे.

  • योग्य उत्तरासाठी ४ गुण, चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा होणार
  • नीट पीजी २०२६ मध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी उमेदवाराला चार गुण मिळतील.
  • चुकीचे उत्तर दिल्यास एक गुणाची निगेटिव्ह मार्किंग केली जाईल.
  • ज्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, त्यांचे कोणतेही गुण जोडले किंवा कापले जाणार नाहीत.
Ramon Magsaysay Award 2026: मॅगसेसे पुरस्कार २०२६ विजेत्या रूना खान कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्या समाज कार्याबाबत सविस्तर..

समान गुण मिळाल्यास असे ठरवली जाईल रँक

जर दोन किंवा त्याहून अधिक उमेदवारांचे गुण समान असतील, तर त्यांची रँक ठरवण्यासाठी टाय-ब्रेकिंग नियम लागू केले जातील. यासाठी सर्वप्रथम ज्या उमेदवाराच्या चुकीच्या उत्तरांची संख्या कमी असेल, त्याला प्राधान्य दिले जाईल. येथे समानता असल्यास सेक्शन ए, बी, सी, डी आणि ई मधील चुकीच्या उत्तरांच्या संख्येचा क्रम पाहिला जाईल. यानंतरही टाय राहिल्यास एमबीबीएसच्या व्यावसायिक परीक्षांमध्ये जास्त एकूण गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आणि शेवटी जास्त वयाच्या उमेदवारांना वरची रँक दिली जाईल.

Azim Premji Scholarship 2026 साठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; पात्र विद्यार्थिनींनी असा करा अर्ज

२,६३,५३५ उमेदवारांची परीक्षा पूर्ण

एनबीएएमएसच्या अपडेटनुसार, नीट पीजी २०२६ साठी २,६५,९८० उमेदवार नोंदणीकृत होते. ही परीक्षा देशभरातील ३३८ शहरांमधील १,१११ केंद्रांवर पार पडली, त्यापैकी २,६३,५३५ उमेदवारांची परीक्षा पूर्ण झाली. मात्र, जयपूरमधील सीतापुरा परिसरातील दोन केंद्रांवर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे परीक्षा पूर्ण होऊ शकली नाही. प्रभावित झालेल्या २,४४५ उमेदवारांसाठी ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पुन्हा परीक्षा घेतली जाईल.

Web Title: Neet pg 2026 answer key marking scheme re exam updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Medical Admission
  • NEET
  • NEET PG Exam

संबंधित बातम्या

NEET PG नंतर कोणती मेडिकल ब्रँच देते सर्वाधिक पगार? जाणून घ्या टॉप-५ हाय-पेइंग स्पेशलायझेशन!
1

NEET PG नंतर कोणती मेडिकल ब्रँच देते सर्वाधिक पगार? जाणून घ्या टॉप-५ हाय-पेइंग स्पेशलायझेशन!

NEET UG 2026 Counselling च्या राउंड २ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू
2

NEET UG 2026 Counselling च्या राउंड २ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू

NEET PG 2026: नीट परीक्षेत वीज गेली किंवा कॉम्प्युटर हँग झाला तर काय कराल? NBEMS ने दिली महत्त्वाची माहिती!
3

NEET PG 2026: नीट परीक्षेत वीज गेली किंवा कॉम्प्युटर हँग झाला तर काय कराल? NBEMS ने दिली महत्त्वाची माहिती!

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!
4

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.