Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET PG Counseling 2026: नीट पीजी समुपदेशनाची पहिली फेरी सुरू! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

NEET PG Counseling 2026: नीट पीजी 2026 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी पोस्ट ग्रॅजुएट (पदव्युत्तर) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. मेडिकल कौन्सिलिंग कमिटी (MCC) आज 12 ऑक्टोबरपासून नीट पीजी कौन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी सुरू करत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 12, 2026 | 03:10 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

NEET PG Counseling 2026:  नीट पीजी 2026 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी पोस्ट ग्रॅजुएट (पदव्युत्तर) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. मेडिकल कौन्सिलिंग कमिटी (MCC) आज 12 ऑक्टोबरपासून नीट पीजी कौन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी सुरू करत आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतील. या कौन्सिलिंगच्या माध्यमातून उमेदवारांना एमडी (MD), एमएस (MS) आणि इतर पीजी मेडिकल प्रोग्राम्समध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळेल. तसेच अर्ज प्रक्रियेदरम्यान कौन्सिलिंग फी आणि सुरक्षा अनामत रक्कम (सिक्युरिटी डिपॉझिट) जमा करावी लागेल.

नीट पीजी कौन्सिलिंग राऊंड 1 चे संपूर्ण वेळापत्रक

नीट पीजी कौन्सिलिंग नोंदणी आज म्हणजेच 12 ऑक्टोबरपासून सुरू होईल. नोंदणीची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत आहे. फी भरण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. चॉइस फिलिंग (पसंती भरणे) 13 ते 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजेपर्यंत करता येईल. चॉइस लॉकिंग 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजेपासून 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत असेल. सीट अलॉटमेंट (जागा वाटप) प्रक्रिया 22 आणि 23 ऑक्टोबर 2026 रोजी होईल. राऊंड 1 सीट अलॉटमेंटचा निकाल 24 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर केला जाईल. महाविद्यालयात रिपोर्टिंग आणि जॉइनिंग 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2026 या कालावधीत असेल. जॉइन झालेल्या उमेदवारांच्या डेटाची पडताळणी 3 नोव्हेंबर 2026 पर्यंत केली जाईल.

कौन्सिलिंगसाठी कोण अर्ज करू शकते?

नीट पीजी 2026 परीक्षेत पात्रता मिळवणारे आणि निर्धारित अटी पूर्ण करणारे उमेदवार राऊंड 1 च्या कौन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकतात. तसेच उमेदवारांना संबंधित वैद्यकीय महाविद्यालय आणि कौन्सिलिंग प्राधिकरणाच्या प्रवेशविषयक अटी देखील पूर्ण कराव्या लागतील. मेडिकल कौन्सिलिंग कमिटी अखिल भारतीय कोट्यातील (All India Quota) 50 टक्के पीजी मेडिकल जागांसाठी कौन्सिलिंग आयोजित करते. याशिवाय, केंद्रीय विद्यापीठे, डीम्ड युनिव्हर्सिटी आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) संबंधित संस्थांच्या जागांचा देखील याच प्रक्रियेमध्ये समावेश असतो.

AI in Education: एआयवर अवलंबून राहणे पडेल महागात; IIT खडकपूरच्या प्राध्यापकांची विद्यार्थ्यांना महत्त्वाची चेतावणी

नीट पीजी कौन्सिलिंगसाठी अशी करा नोंदणी

1. कौन्सिलिंगसाठी सर्वात पहले अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. त्यानंतर होमपेजवर दिलेल्या मेडिकल कौन्सिलिंग सेक्शनवर क्लिक करा.

3. आता नीट पीजी कौन्सिलिंगसाठी नोंदणी करा.

4. त्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरा आणि लॉग इन करा.

6. आता अर्ज फॉर्ममध्ये आपली वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.

7. त्यानंतर आवश्यक तपशील आणि कागदपत्रे उपलब्ध करून द्या.

8. आता निर्धारित नोंदणी फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटचे पेमेंट करा.

9. फॉर्ममध्ये भरलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि अर्ज सबमिट करा.

10 नोंदणी पूर्ण झाल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून घ्या.

United Nations मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहात? जाणून घ्या आवश्यक कौशल्ये आणि अर्ज प्रक्रिया..

कौन्सिलिंगसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • नीट पीजी प्रवेशपत्र
  • नीट पीजी गुणपत्रिका
  • एमबीबीएस पदवी किंवा प्रोव्हिजनल प्रमाणपत्र
  • एमबीबीएसची गुणपत्रिका
  • इंटरशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  • वैध फोटो ओळखपत्र
  • स्थायी किंवा प्रोव्हिजनल मेडिकल रजिस्ट्रेशन
  • लागू असल्यास प्रवर्ग किंवा दिव्यांग प्रमाणपत्र
  • जागा वाटप झाल्यानंतर अलॉटमेंट लेटर

Web Title: Neet pg counseling 2026 round 1 registration schedule eligibility sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Admission News
  • NEET PG Exam
  • NEET PG Result

संबंधित बातम्या

CAT Exam 2026: कॅट परीक्षेच्या अर्जांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी घट! तरुण MBAकडे पाठ का फिरवत आहेत? जाणून घ्या
1

CAT Exam 2026: कॅट परीक्षेच्या अर्जांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी घट! तरुण MBAकडे पाठ का फिरवत आहेत? जाणून घ्या

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
2

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.