Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

NEET PG 2026 Result: नीट पीजी २०२६ चा निकाल जाहीर झाला असून पात्रता पर्सेंटाईलबाबत पुन्हा चर्चा सुरू आहे. शून्य किंवा निगेटिव्ह गुण असलेल्यांना काउन्सिलिंगची संधी मिळणार का? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 06, 2026 | 03:27 PM
neet pg

neet pg

Follow Us
Follow Us:

NEET PG 2026 Result: अलीकडेच नीट पीजी २०२६ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पात्रता पर्सेंटाईलबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) द्वारे जारी केलेल्या निकालानुसार, या वेळी २,६३,५३५ उमेदवार पात्र ठरले आहेत. तर परीक्षा देणाऱ्या २५८ उमेदवारांचे गुण शून्य किंवा त्याहूनही कमी आले आहेत. सर्वात कमी गुण मिळवलेल्या उमेदवारांचे गुण -५९ असल्याचे आणि पर्सेंटाईल शून्य असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षाप्रमाणे या वेळीही ० पर्सेंटाईल किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्या उमेदवारांना काउन्सिलिंगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोविड-१९ नंतर २०२३ मध्ये पहिल्यांदा नीट पीजीचे पात्रता पर्सेंटाईल कमी करून ० करण्यात आले होते. यामुळे अतिशय कमी आणि निगेटिव्ह गुण मिळालेले उमेदवारही काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी पात्र ठरले होते. यानंतर २०२५ मध्येही कटऑफमध्ये मोठी कपात करण्यात आली होती. या कपातीमागे पीजीच्या जागा रिक्त राहणे हे मोठे कारण होते. देशभरात पीजी मेडिकलच्या १८ हजारांहून अधिक जागा रिक्त असून त्या भरण्यासाठीच पात्रता निकषांमध्ये बदल करण्यात आल्याचे एनबीईएमएसने न्यायालयात सांगितले होते.

सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले प्रकरण

पात्रता पर्सेंटाईल कमी करण्याच्या निर्णयावर वैद्यकीय क्षेत्रातील एका वर्गाने प्रश्न उपस्थित केले आहेत. फेब्रुवारी २०२६ मध्ये या मुद्द्याशी संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, ज्यामध्ये सरकार आणि एनबीईएमएसकडे उत्तर मागितले गेले. कटऑफ कमी करण्यावर याचिकाकर्त्यांनी भारतीय संविधानाच्या कलम १४ आणि २१ शी जोडून आक्षेप घेतला होता. ० पर्सेंटाईलच्या निर्णयाला युएफडीए (UDFA) नेही विरोध दर्शवला होता. अतिशय कमी किंवा निगेटिव्ह गुण मिळालेल्या उमेदवारांना पोस्ट ग्रॅजुएट मेडिकल ट्रेनिंगमध्ये प्रवेश दिल्यास वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि पुढे जाऊन रुग्णांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा युक्तिवाद या संघटनेने केला होता.

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!

दिल्ली उच्च न्यायालयानेही हस्तक्षेपानास दिला होता नकार

शून्य पर्सेंटाईल विरोधात जानेवारी २०२६ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातही प्रकरण पोहोचले होते. पात्रता निकष कमी करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला होता. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित धोके आणि वैद्यकीय दर्जा घसरण्याशी संबंधित तर्कही न्यायालयासमोर मांडण्यात आले होते, परंतु न्यायालयाला या प्रक्रियेत अशी कोणतीही गडबड आढळली नाही, ज्यामुळे सुरू असलेल्या काउन्सिलिंगमध्ये हस्तक्षेप केला जावा. काउन्सिलिंगमध्ये जास्त रँक असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते, असे एनएमसीकडूनही सांगण्यात आले होते.

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

या वेळी पीजीच्या किती जागा आहेत?

एनएमसीने जारी केलेल्या सीट मॅट्रिक्सनुसार, यंदा देशात पोस्ट ग्रॅजुएट मेडिकलच्या एकूण ५८,००० जागा आहेत, गेल्या वर्षी या जागा ५२,१७३ होत्या. यंदाच्या परीक्षेसाठी २,७३,०९६ उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि २,६५,९८० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या व्यापक सीट आकडेवारीमध्ये ३३,०८८ सरकारी, २१,८९२ खाजगी आणि ८,१९७ युनिव्हर्सिटीच्या जागांचाही समावेश आहे.

Web Title: Neet pg 2026 result qualifying percentile counseling sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • education
  • NEET PG Exam
  • NEET PG Result

संबंधित बातम्या

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
2

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
3

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

Matheran Health Camp: माथेरानमधील विद्यार्थ्यांसाठी धावले डॉक्टर! नगरपरिषद शाळेत यशस्वी आरोग्य शिबिर पार पडले
4

Matheran Health Camp: माथेरानमधील विद्यार्थ्यांसाठी धावले डॉक्टर! नगरपरिषद शाळेत यशस्वी आरोग्य शिबिर पार पडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.