Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Result Controversy: NTA पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली! बिंदुश्री पवारचे NEET पुनर्रपरीक्षेच्या निकालावर गंभीर आरोप!

NEET Result Controversy Update: कर्नाटकातील बिंदुश्री पवार हिने NEET पुनर्रपरीक्षेच्या OMR शीटमध्ये छेडछाडीचा आरोप केला आहे. ६६८ गुणांऐवजी मायनस ११ गुण मिळाल्याने NTA च्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 28, 2026 | 04:42 PM
NEET

NEET

Follow Us
Follow Us:

NEET Result Controversy Update: NEET-UG २०२६ च्या पुनर्रपरीक्षेच्या निकालावरून नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कर्नाटकातील एका विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, तिच्या ओएमआर उत्तरपत्रिकेत गंभीर छेडछाड किंवा त्रुटी झाली आहे, ज्यामुळे तिला अपेक्षित गुणांऐवजी चक्क मायनस ११ (-11) गुण मिळाले आहेत. विद्यार्थिनीचा दावा आहे की तिला सुमारे ६६८ गुण मिळायला हवे होते, परंतु जाहीर झालेल्या निकालात पूर्णपणे वेगळाच स्कोअर दाखवण्यात आला आहे. यामुळे तिचे वैद्यकीय प्रवेशाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

OMR शीटमध्ये छेडछाडीचा आरोप

कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील हंगल तालुक्यात राहणाऱ्या बिंदुश्री जगदीश पवार हिचा असा आरोप आहे की, परीक्षेनंतर NTA कडून जारी करण्यात आलेली OMR शीट ही तिने प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान भरलेल्या OMR शीटशी जुळत नाही. तिचे म्हणणे आहे की, अधिकृत रेकॉर्डमध्ये असे अनेक उत्तर नोंदवले गेले आहेत, जे तिने कधी निवडलेच नव्हते.

NTA च्या मूल्यमापनावर प्रश्न उपस्थित करताना विद्यार्थिनीने सांगितले की, एजन्सीच्या रेकॉर्डनुसार तिने अवघ्या १ मिनिटात ४१ प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. हे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असून OMR रेकॉर्डमध्ये मोठी गडबड असल्याचे यावरून स्पष्ट होते.

NTA कडे वारंवार तक्रार, पण उत्तर नाही

बिंदुश्रीचे म्हणणे आहे की, तिने याप्रकरणी NTA च्या हेल्पलाइनवर आणि संबंधित अधिकाऱ्यांशी अनेकदा संपर्क साधला. तिने उत्तरपत्रिकेची तपासणी आणि गुणांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली, परंतु अद्याप तिला कोणतेही उत्तर मिळालेले नाही. गंभीर तक्रार करूनही NTA कडून कोणताही स्पष्ट प्रतिसाद देण्यात आलेला नाही, असा आरोप तिने केला आहे.

Rajesh Gopakumar: IIT-JEE Top केल्यानंतर सोडली इंजिनिअरिंग; कोण आहेत जगात डंका वाजवणारे भारतीय शास्त्रज्ञ राजेश गोपाकुमार?

इतर विद्यार्थ्यांनीही उपस्थित केले प्रश्न

हे प्रकरण केवळ एका विद्यार्थिनीपुरते मर्यादित नाही. कर्नाटकात पुनर्रपरीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही असा आरोप केला आहे की, अंतिम अन्सर की नुसार त्यांनी काढलेले गुण आणि घोषित झालेला निकाल यात मोठा फरक आहे.

काही विद्यार्थ्यांचा दावा आहे की त्यांचे १० ते २५ गुण कमी झाले आहेत, ज्यामुळे त्यांच्या ‘ऑल इंडिया रँक’मध्ये हजारो क्रमांकांचा फरक पडला आहे आणि मेडिकल कॉलेजमधील प्रवेशाची शक्यता कमी झाली आहे. काही उमेदवारांनी असाही आरोप केला की NTA ने अपलोड केलेली OMR शीट त्यांच्या मूळ उत्तरांशी जुळत नाही. या सर्व प्रकरणांनंतर मूल्यमापन प्रक्रियेच्या निष्पक्षतेची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

CBSE 10th Board Result: ‘बेस्ट ऑफ टू’ नियमामुळे १० वीच्या निकालात कसा झाला बदल? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

NTA चे काय म्हणणे आहे?

या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर NTA ने आधीचे काही दावे फेटाळताना सांगितले होते की, सोशल मीडियावर फिरणारे अनेक आरोप बनावट किंवा AI द्वारे तयार केलेल्या कंटेंटवर आधारित आहेत. मूल्यांकनाची प्रक्रिया ही केवळ मूळ OMR शीटच्या आधारेच केली जाते, असे एजन्सीचे म्हणणे होते.

मात्र, बिंदुश्री जगदीश पवार या विद्यार्थिनीच्या विशिष्ट प्रकरणावर NTA कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Web Title: Neet result controversy row omr sheet tampering allegation bindushree pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • controversy
  • NEET
  • neet paper leak
  • NEET Re-Exam

संबंधित बातम्या

Eiffel Tower Controversy : अन् पॅरिस पेटलं ;आयफेल टॉवरवर ‘लेडीज फर्स्ट’चा वाद
1

Eiffel Tower Controversy : अन् पॅरिस पेटलं ;आयफेल टॉवरवर ‘लेडीज फर्स्ट’चा वाद

पेपरफुटीमुळे MPSC ला दणका! औषध निरीक्षक परीक्षा रद्द, तर कृषी सेवेच्या गुणदानावर विद्यार्थ्यांचे गंभीर आक्षेप
2

पेपरफुटीमुळे MPSC ला दणका! औषध निरीक्षक परीक्षा रद्द, तर कृषी सेवेच्या गुणदानावर विद्यार्थ्यांचे गंभीर आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.